e two wheelers price to decrease by 15 thousand rupees government increased subsidy on e vehicles
१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 2:44 PM1 / 10E-Vehicle : देशात इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकल (E-Two wheelers) स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. 2 / 10इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सध्याच्या FAME-2 स्कीममध्ये सुधारणा करत वाहनांना देण्यात येणारी सब्सिडी वाढवण्यात आली आहे.3 / 10आता इलेक्ट्रिक टू व्हिलर्ससाठी प्रति kWh वर मिळणारी १० रूपयांचं अनुदान वाढवून १५ हजार रुपये करण्यात आली आहे.4 / 10सरकारकडून अनुदानात वाढ केल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस चालना मिळेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या दुचाकींच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर्स किंवा मोटरसायकल्स या २० टक्के अधिक महागड्या आहेत. 5 / 10परंतु सरकार अनुदान वाढवून अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यास प्रोत्साहन देत आहे. यामुळे प्रदुषणाचा स्तर कमी करण्यासही मदत मिळेल. 6 / 10नुकतीच Ather या कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप 450x या स्कूटरच्या किंमतीत १४,५०० रूपयांची घट केली होती. याशिवाय Revolt या कंपनीनंदेखील आपल्या इ-बाईक्ससाठी नवी स्कीम आणली होती.7 / 10सरकारच्या यो घोषणेनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. FAME-2 नियमांमध्ये सुधारणा करून सरकार अनुदानाची किंमत गाड्यांच्या किंमतीच्या ४० टक्क्यांपर्यंत घेऊन जाऊ इच्छित आहे. 8 / 10तसंच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बस आणि तीन चाकी वाहनांच्या खरेदीच्याही विचारात आहे. EESL ला लवकरच तीन लाख इलेक्ट्रिक इ-रिक्षा खरेदी करण्याचे निर्देशही दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 9 / 10याचा निरनिराळ्या सेगमेंटमध्ये वापर करण्यात येणार आहे. EESL च्या म्हणण्यानुसार मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ई बसची एकूण मागणी किती आहे याची माहिती घेतली जाईल. 10 / 10सद्यस्थितीत गुजरात, दिल्ली आणि नागपुरमध्ये सर्वाधिक ई-बसेस आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर त्या २०० किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात. यामध्ये बॅटरी बदलण्याचीही सुविधा आहे. तसंच सिंगल चार्जवर त्या पूर्ण दिवसही चालू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications