घरी, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारद्वारे अशी करा कमाई; महिन्याला लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 10:46 IST
1 / 6सध्या बाजारात एवढ्या कार खपत आहेत, त्या कार बहुतांश पार्किंगमध्येच उभ्या असतात. शहरात जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर एकतर रोज वॉचमन कार धुवून पुसून देतात नाहीतर तशीच धुळ खात पडलेली असते. मग विकेंडला बाहेर काढतात. परत आठवडाभर जागेवरच उभी असते, फक्त ईएमआय भरत राहतात. ही उभी कार तुम्हाला दर महिन्याला चांगला इन्कम मिळवून देऊ शकते. 2 / 6जर तुमच्याकडे जुनी कार असेल तर तिचे रुपांतर तुम्ही फुड व्हॅनमधून करू शकता. फुड स्टॉल लावून तुम्ही महिन्याला लाखभर रुपये कमवू शकता. अनेकदा तुम्हाला रस्त्याच्या कडेला छोटी कारमधून पुस्तक किंवा अन्य काही छोट्या छोट्या वस्तूंची विक्री करताना लोक दिसतील. तसेही तुम्ही एखादा व्यक्ती कामाला ठेवून त्याच्याकडून करवून घेऊ शकता. चप्पला, कपडे, भाजीपाला आदी गोष्टी तुम्ही विकू शकता. 3 / 6जर तुम्ही नोकरी, धंदा करत असाल आणि कार चालवत नसाल तर ती कार तुम्ही कोणत्याही खासगी कंपनीला भाडेतत्वावर लावू शकता. या कंपन्या ती कार त्यांचे कर्मचारी ने-आण, किंवा अधिकाऱ्यांसाठी वापरतात. यानुसार तुम्हाला भाडे देतात. कारचा हप्ता आणि थोडी वरकमाई जरी झाली तरी बास आहे. 4 / 6खासगी कार काही दिवसांसाठी लोकांना भाड्याने देणाऱ्या कंपन्याही बाजारात आहेत. त्यांना देखील तुम्ही तुमची कार देऊ शकता. या कंपन्या तुम्हाला त्या बदल्यात पैसे देतात. या कंपन्या ऑनलाईनही उपलब्ध आहेत. परंतू, असे करताना तुम्ही त्या कंपनीची माहिती काढणे गरजेचे आहे. 5 / 6तुमची कार तुम्ही एखादी शाळा किंवा कॉल सेंटरला लावू शकता. असे करून तुम्ही महिन्याला लाखभर रुपये कमवू शकता. 6 / 6गावातही लोक आपल्या खासगी कार भाड्याने देऊन पैसे कमवू शकतात. लग्नाच्या सीझनमध्ये रेंटवर देऊ शकतात.