शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Bikes: सिंगल चार्जवर 307Km रेंज; या आहेत देशातील टॉप-3 EV बाईक, पाहा किंमत अन् फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 1:45 PM

1 / 7
Longest Driving Range Electric Bikes: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. आता ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी पूर्वीपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: टू-व्हिलर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ग्राहकांकडे बरेच पर्याय आहेत. परंतु बहुतेक पर्याय इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात आहेत, तर इलेक्ट्रिक बाइकसाठी मर्यादित पर्याय आहेत. आम्ही तुम्हाला 3 अशा EV बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला दमदार पॉवरसह सर्वाधिक रेंज मिळते.
2 / 7
Ultraviolette F77- अल्ट्राव्हायोलेट F77 ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे. F77 या बाईकचे नाव आहे आणि Ultraviolette ही कंपनी आहे. ही बाईक स्टँडर्ड आणि रेकॉन या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 7.1kWh बॅटरी पॅक आहे, जो 206KM पर्यंतची रेंज देतो. तर, रेकॉन व्हेरियंटमध्ये 10.5kWh बॅटरी पॅक आहे, जो 307KM पर्यंत रेंज ऑफर करतो. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास लागतात.
3 / 7
बाईक फक्त 2.9 सेकंदात 0 ते 60KMPH पर्यंत वेग पकडू शकते. याचा टॉप स्पीड 152Kmph आहे. या बाईकची किंमत तोडी जास्त आहे. स्टँडर्ड व्हेरियंटची किंमत रु. 3.80 लाख आहे तर रेकॉन व्हेरियंटची किंमत रु. 4.55 लाख (एक्स-शोरूम) आहे. याचे काही लिमिटेड एडिशन मॉडेल देखील आहे, ज्याची किंमत 5.50 लाख रुपये आहे.
4 / 7
Komaki Ranger- कोमाकी रेंजर ही देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक आहे. यात 3.6kWh बॅटरी पॅक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ही बाईक एका चार्जवर 200 ते 250 किलोमीटरची रेंज देऊ शकते. बाइकमध्ये 4kW BLDC इलेक्ट्रिक मोटर आहे. याचा टॉप स्पीड 80KMPH आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात.
5 / 7
बाईकसोबत फॉक्स एक्झॉस्ट सिस्टीम उपलब्ध आहे आणि स्पीकर देखील दिले आहेत, ज्यामुळे तुम्ही ICE बाईक सारखा कृत्रिम आवाज तयार करू शकता. यात एलईडी लाइट्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाइल चार्जिंग पोर्ट, रिव्हर्स क्रूझ कंट्रोल आणि साइड स्टँड सेन्सर्स अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. या बाईकची किंमत 1.85 लाख रुपये आहे.
6 / 7
Oben Rorr- ही इलेक्ट्रिक बाइक स्पोर्टी लुक आणि डिझाइनसह येते. यात 4.4 kWh बॅटरी पॅक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ही एका चार्जवर 187 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. ही केवळ 3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग गाठू शकते.
7 / 7
या बाईकचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, याची बॅटरी 2 तासात 80% पर्यंत चार्ज होते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ड्रायव्हर अलर्ट सिस्टम, थेफ्ट प्रोटेक्शन असे अनेक फिचर्स आहेत. त्याची किंमत 1.50 लाख रुपये आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहन