शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Crayon Envy : केवळ १४ रुपयांत १०० किमीचा प्रवास; जबरदस्त रेंज असलेली मेड इन इंडिया Electric Scooter लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 8:59 AM

1 / 8
Crayon Envy Electric Scooter: इलेक्ट्रीक स्कूटर उत्पादक कंपनी Crayon ने नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची रेंजही उत्तम आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 160 किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
2 / 8
या स्कूटरमध्ये कम्फर्ट सीट देण्यात आली आहे आणि लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये जियो टॅगिंग, सेंट्रल लॉकिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि एक मोबाईल चार्जिंग पोर्टही देण्यात आलाय.
3 / 8
डिझाइनबाबत सांगायचं झालं तर यामध्ये ड्युअल हेडलाईट्स देण्यात आलेत. हे हेडलाईट्स आकर्षक डिझाईनसोबत कमी प्रकाशात उत्तम व्हिजिबलीटी देतात. या स्कूटरमध्ये 250 वॉटची मोटर देण्यात आली आहे.
4 / 8
या मोटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे. तसंच ही स्कूटर 150 किलोचं वजन घेऊन सहजरित्या जाऊ शकते. या सेगमेंटमध्ये चालकाला स्कूटर चालवण्यासाठी लायसन्सची गरजही नाही.
5 / 8
या स्कूटरमध्ये निरनिराळ्या मायलेजनुसार निरनिराळे व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. तर ही स्कूटर चार रंगांमध्ये खरेदी केली जाऊ शकते.
6 / 8
याशिवाय क्रेयॉन इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये ड्युअल ट्युबलेस टायर्स, डिस्क ब्रेक आमि 150 एमएमचं ग्राऊंड क्लिअरन्स मिळतं. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 64 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
7 / 8
या स्कूटरच्या मोटर आणि कंट्रोलरवर 24 महिन्यांची वॉरंटी दिली जाते. याशिवाय यात रिव्हर्स असिस्ट फीचरही देण्यात आलंय. ही स्कूटर पुढे आणि मागे दोन्ही बाजूला चालवली जाऊ शकते.
8 / 8
याशिवाय यात अनेक फीचर्स आणि अधिक बूटस्पेस देण्यात आली आहे. तर यात कीलेस स्टार्टअप सिस्टमही देण्यात आलंय. देशभरातील 100 पेक्षा अधिक रिटेल लोकेशन्सवर ही स्कूटर खरेदी केली जाऊ शकते.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड