शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Scooter: 50 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रीक स्कूटर; 'हे' आहेत उत्तम पर्याय, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 7:08 PM

1 / 7
Electric Scooter:पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांकडे वळत आहेत. गेल्या काही वर्षात भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. आता तुम्हीही तुमच्या स्कूटरमध्ये दररोज पेट्रोल भरून थकला असाल आणि कमी बजेटमध्ये इलेक्ट्रीक स्कूटर हवी असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
2 / 7
आज आम्ही काही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत. या बजेट फ्रेंडली स्कूटर तुम्हाला पेट्रोलच्या खर्चापासून मुक्त करतील. विशेष म्हणजे, या इलेक्ट्रिक स्कूटर अवघ्या 50,000 च्या आत घरी आणू शकता. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, Komaki, Bounce, Avon आणि Raftaar या कंपन्यांनी जबरदस्त लूक आणि विविध फीचर्स असलेल्या तसेच 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे, या स्कूटर कमी किमतीत चांगली रेंज ऑफर करतात.
3 / 7
बाऊन्सकडे 50 हजारात 4 इलेक्ट्रिक स्कूटर- इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी बाउन्स ही भारतीय कंपनी ग्राहकांसाठी अनेक पर्याय ऑफर करते. कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Bounce Infinity E1 अवघ्या 50,000 रुपयांमध्ये येते. याची स्कूटरची किंमत 45,099 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
4 / 7
यानंतर, दुसरा पर्याय Avon E Scootचा आहे. हीदेखील कमी किमतीत मिळणारी एक चांगली स्कूटर आहे. या स्कूटरची किंमत 49,696 रुपये (एक्स-शोरूम) आहे. याची बॅटरी एका चार्जमध्ये 65 किमीची रेंज देते. शहरांतर्गत प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
5 / 7
यानंतर तिसरा पर्याय Raftaar Electricaया आहे. या स्कूटरची किंमत 48,540 रुपयांपासून सुरू होते. या EV च्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर याची बॅटरी एका चार्जमध्ये 100km ची रेंज देते. कंपनीची Greta Harper ZX Series-I इलेक्ट्रिक स्कूटर देखील एक उत्तम पर्याय आहे. याची किंमत 41,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
6 / 7
कोमाकीमध्ये 50,000 रुपयांच्या खाली तीन पर्याय- इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी Komaki ने त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर 50,000 रुपयांमध्ये बाजारात आणल्या आहेत. सर्वात कमी दरातील स्कूटर म्हणजे, Komaki XGT KM इलेक्ट्रिक स्कूटर, ज्याची किंमत Rs.42,500 (एक्स शोरूम) आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 85km ची रेंज देते.
7 / 7
यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Komaki Xone इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची किंमत 45,000 रुपये आहे. या EV ची रेंज देखील Komaki XGT KM सारखीच आहे. यानंतर कंपनीचा Komaki X2 Vouge देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. याची किंमत 47,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. याची बॅटरी रेंज 85km आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन