शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१९० किलोमीटरची जबरदस्त रेंज, किंमत ५३ हजारांपासून; पाहा जबरदस्त Electric Scooter, फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 7:40 PM

1 / 6
Accelero+ Electric Scooter : गेल्या काही वर्षांत, इलेक्ट्रीक टू-व्हीलर सेगमेंटने अनेक स्टार्टअप्स आणि टेक कंपन्यांना आकर्षित केले आहे. या सेगमेंटमध्ये सध्या स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाझली आहे.
2 / 6
NIJ Automotive ने नुकतीच आपली Accelero+ इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च केली आहे. हे ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरँग-शैलीतील एलईडी इंडिकेटरसह येते. ही स्कूटर इम्पीरियल रेड, ब्लॅक ब्युटी, पर्ल व्हाइट आणि ग्रे टच कलर्समध्ये उपलब्ध आहे.
3 / 6
Accelero+ मध्ये क्रुझ कंट्रोलसारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान हे फीचर कामी येईल. स्कूटर चार बॅटरी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे, यामध्ये लेड-अॅसिड बॅटरी आणि 3 LFP बॅटरी पॅक समाविष्ट आहे. LFP बॅटरीचे पर्याय ड्युअल बॅटरी सेटअपसह 1.5 Kw (48V), 1.5 Kw (60V) आणि 3 Kw 48V मध्ये उपलब्ध आहेत.
4 / 6
Accelero+ या स्कूटरमध्ये तीन राइड मोड्स मिळतात, इको मोडमध्ये ही स्कूटर 190 किमीची रेंज देते. हे ड्युअल एलएफपी बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. सिटी मोडमध्ये ही स्कूटर 140 किमी ची रेज देत असल्याचं कंपनीनं म्हटलंय.
5 / 6
बॅटरी पॅकच्या आधारावर Accelero आणि Accelero+ इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 53,000 ते 98,000 रुपयांपर्यंत आहे. तुम्हाला लेड अॅसिड बॅटरी व्हेरिअंटसाठी 53000 रुपये, 1.5 kW व्हेरिएंटसाठी 69000 रुपये आणि 3 kW व्हेरिएंटसाठी 98000 रुपये द्यावे लागतील.
6 / 6
NIJ ऑटोमोटिव्ह या वर्षाच्या अखेरिस आपली पाचवी इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करेल. R14 नावाची ही स्कूटर NIJ ऑटोमोटिव्हच्या इतर ईव्हीपेक्षा चांगली असण्याची शक्यता आहे. या क्षणी अचूक तपशील उपलब्ध नसले तरी, R14 मध्ये हाय-टेक BLDC मोटर अपेक्षित आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbusinessव्यवसाय