175km रेंज अन् किंमत 1 लाखांपेक्षा कमी; 'या' EV बाईकला प्रचंड मागणी, जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 16:11 IST
1 / 10Electric Vehicle : भारतात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याच वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक बाईकच्या किमती वाढवल्या आहेत. ही बाईक 175 किमीच्या रेंजसह येते, शिवाय यात अनेक उत्तम फीचर्सदेखील मिळतात.2 / 10ओबेन इलेक्ट्रिकने आपल्या Rorr EZ इलेक्ट्रिक बाईकची किंमत वाढवली आहे. आता ही बाईक सुमारे 10 हजार रुपयांनी महाग झाली आहे. वाढलेली किंमत फक्त इलेक्ट्रिक बाइकच्या टॉप व्हेरियंटवरच लागू असेल.3 / 10बाईकची सुरुवातीची किंमत 89,999 रुपये फक्त एक्स-शोरूम राहील. वाढीव किंमत 1 फेब्रुवारीपासून लागू झाल्या आहेत. Rorr EZ ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक आहे.4 / 10Rorr EZ इलेक्ट्रिक बाईक 3 बॅटरी पॅकच्या पर्यायासह बाजारात उपलब्ध आहे. यात 2.4 kWh, 3.4 kWh आणि 4.4 kWh चा पर्याय आहे. 2.6 kWh बॅटरी पॅकसह इलेक्ट्रिक बाईक एका चार्जवर 110 किमी पर्यंतची रेंज देते. ही पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 45 मिनिटे लागतात.5 / 103.4 kWh बॅटरी पॅकसह येणारी बाईक 140 किमी पर्यंतची रेंज देते. याचा चार्जिंग वेळ 1.30 तास आहे.6 / 10बाईकचे टॉप मॉडेल, जे 4.4 kWh बॅटरी पॅकसह येते, एका चार्जवर 175 किमी धावू शकते. चार्ज करण्यासाठी 2 तास लागतात.7 / 10बाईकच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनो शॉक ऍब्जॉर्बर देण्यात आला आहे. बाईकला 17 इंची चाके आहेत. बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत.8 / 10Rorr EZ इलेक्ट्रिक बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात 7.5 kW मोटर आहे, जी 10 bhp पॉवर जनरेट करते. ही बाईक केवळ 3.3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. बाईकच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ती 95 किमी आहे. 9 / 10तुम्हाला त्यामध्ये सर्वत्र एलईडी लाईट पाहायला मिळतील. बाईकमध्ये फ्लोटिंग डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, थेफ्ट प्रोटेक्शन, युनिफाइड ब्रेक असिस्ट, ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.10 / 10ओबेन इलेक्ट्रिक बाईकवर 3 वर्षे किंवा 75 हजार किमीची वॉरंटी देखील आहे. ही इलेक्ट्रिक बाइक भारतीय बाजारपेठेत Revolt RV400 BRZ ला टक्कर देते.