शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Vehicle: Hondaच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, लवकरच येणार Activaचे इलेक्ट्रीक व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 3:42 PM

1 / 8
नवी दिल्लीः भारतात इलेक्ट्रीक गाड्यांचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. सध्या हिरोसह अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर आणि मोटारसायकल मार्केटमध्ये आहेत. यात आता होंडाचे नाव जोडले जाणार आहे.
2 / 8
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे (Honda Motorcycle & Scooter India ) अध्यक्ष असुशी ओगाता यांनी सांगितल्यानुसार, होंडा लवकरच भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये एंट्री करणार आहे.
3 / 8
एका मीडिया हाउसला दिलेल्या मुलाखतीत ओगाता म्हणाले की, पुढील आर्थिक वर्षात होंडा इलेक्ट्रिक व्हिकल लॉन्च करणार आहे. होंडाने मागच्या वर्षीच इलेक्ट्रीक व्हिकलवर काम सुरू केले होते.
4 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, होंडा सध्या बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासाठी कंपनीने होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि. नावाची सब्सिडिअरी कंपनी सुरू केली आहे.
5 / 8
ही कंपनी बंगळुरुमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे पायलेट रन टेस्ट करत आहे. यापूर्वी बाउंस इलेक्ट्रिकने सब्सक्रिप्शनच्या आधारावर बॅटरी स्वॅपिंग मॉडेल सादर केले आहे.
6 / 8
तिकडे, हिरोनेही गोगोरोसोबत या तंत्रज्ञानासाठी करार केला आहे. त्यामुळे लवकरच भारतात बॅटरी स्वॅपिंग इलेक्ट्रिक वाहन पाहायला मिळू शकतात.
7 / 8
होंडाने इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये एंट्री करण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीची सर्वात लोकप्रिय अॅक्टिव्हा नवीन इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
8 / 8
याची टक्कर बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक आणि आगामी सुजुकी बर्गमन इलेक्ट्रिकसोबत असेल. अॅक्टिव्हा भारतीय बाजारात खूप लोकप्रिय असून, याचे इलेक्ट्रीक व्हर्जन गेम चेंजर ठरू शकते, असा कंपनीचा दावा आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरHondaहोंडा