Entry of Maruti's mini SUV; see the price and features of S-Presso
मारुतीच्या मिनी एसयुव्हीची एन्ट्री; जाणून घ्या S-Presso ची किंमत आणि फिचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 1:49 PM1 / 9भारतातील वाहन क्षेत्र कात टाकत आहे. पॉश, चकचकीत वाहनांची सध्या बाजारात चलती असल्याने जुन्या मॉडेलकडे कोणी फिरकत नाहीय. मारुतीनेही अन्य कंपन्यांच्या स्पर्धेत राहण्यासाठी मिनी एसयुव्ही लाँच केली आहे. S-Presso ही कार आज भारतीय बाजारात उतरवण्यात आली. 2 / 9Maruti Suzuki S-Presso मध्ये 998 सीसीचे BS VI इंजिन देण्यात आले आहे. याद्वारे 5500Rpm वर 50 किलो वॉटची ताकद आणि 3500Rpm वर 90 Nm टॉर्क उत्पन्ना होणार आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एजीएस देण्यात आले आहे. 3 / 9कारचे मायलेजही चांगले आहे. स्टँडर्ड आणि LXi व्हेरिअंटसाठी प्रति लीटर 21.4 किमीचे मायलेज देण्याच दावा कंपनीने केला आहे. तर VXi MT आणि VXi+ MT व्हेरिअंटला जास्त मायलेज मिळणार आहे. कंपनीने 21.7 किमीचा दावा केला आहे. याचसोबत VXi AGS आणि VXi+ AGS व्हेरिअंटसाठीही 21.7 मायलेज मिळणार आहे.4 / 9एस प्रेसोचे रुप मागून काहीसे सुझुकीची छोटी कार इग्निससारखे असून पुढील भाग महिंद्राच्या एक्सयुव्ही 100 सारखा आहे. लांबी 3565 मीमी, रुंदी 1520 मीमी, उंची (Std., LXi) 1549mm (VXi, VXi+) 1564mm, देण्यात आली आहे. 5 / 9व्हीलबेस 2380mm असून कारमध्ये 5 जण बसू शकतात. कारमध्ये 27 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. 6 / 9एस प्रेसो सॉलिड सिजल ऑरेंज, पर्ल स्टैरी ब्लू, सुपर व्हाइट, सॉलिड फायर रेड, मेटालिक ग्रेनाईट ग्रे आणि मेटलिक सिल्की सिल्व्हर अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. 7 / 9या कारची सुरुवातीची किंमत 3,69,000 असून वरचे व्हेरिअंट 4.91 लाखांना मिळणार आहेत. एलईडी डीआरएल आणि मोठा ग्राऊंड क्लिअरन्ससह या कारमध्ये 10 हून अधिक सेफ्टी फिचर देण्यात आले आहेत. 8 / 9डिझाईन फ्युचरएस सारखी आहे. डॅशबोर्डच्यामध्ये डिजिटल स्पीटोमीटर आणि टॅकोमीटर देण्यात आला आहे. तर मध्ये स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्य़ात आली आहे. 9 / 9ही कार पाहिली वरील दोन कारचा लूक आठवतो. आणखी वाचा Subscribe to Notifications