शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pulsar आणि Apache ला मिळणार टक्कर; लॉन्च झाली नवीन EV बाइक, 2 वर्षे मोफत चार्जिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 4:32 PM

1 / 5
Electric Bike : भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या Tork Motors ने Kratos X इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे, ज्यामध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि डिझाइन वापरण्यात आले आहे. कंपनीने ही बाईक ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केली. या बाईकला Kratos R चे अपडेटेड व्हर्जन म्हणून शोकेस केले गेले. कंपनीने मूळ Kratos बंद करण्याची घोषणा केली आहे.
2 / 5
पुणेस्थित टॉर्क मोटर्स सध्या पुणे, हैदराबाद, पाटणा यासह काही शहरांमध्येच आपल्या बाईक विकते. पण, कंपनी आता मार्च 2023 पर्यंत आणखी काही भारतीय शहरांमध्ये आपली बाईक विकण्याच्या विचारात आहे. टॉर्क मोटर्सने गेल्या वर्षी भारतात पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली होती.
3 / 5
Kratos X इलेक्ट्रिक मोटरसायकलला लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. ही बाईक एका चार्जवर 120 किमी धावू शकते. तसेच 4 सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग आणि 100 किमी/ताशी सर्वोच्च गतीसह येते. Tork Kratos R मध्ये 9 kWh इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 12 hp आणि 38 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकचा पिकअप आणि टॉप स्पीड नवीन बाईक प्रमाणेच आहे.
4 / 5
कंपनीचा दावा आहे की Kratos X एक आरामदायी आणि चांगली परफॉर्मन्स राइड देईल. याला मोठी बॅटरी देखील मिळते. वैशिष्ट्यांमध्ये Android सह 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नेव्हिगेशन सिस्टीम आहे. याशिवाय एक अॅल्युमिनियम स्विंगआर्म, साईड पॅनल्सवर नवीन डिझाइन आणि नवीन फ्युरियस फास्ट रायडिंग मोड देखील देण्यात आला आहे.
5 / 5
तसेच जिओ-फेन्सिंग, वाहन शोधा, ट्रॅक मोड, क्रॅश अलर्ट आणि व्हेकेशन मोड यासारख्या वैशिष्ट्यांसह ही बाईक येते. या बाईकसोबत एक पोर्टेबल चार्जर देण्यात येईल, जो बाईकला घरच्या चार्जरप्रमाणे जलद चार्ज करू शकतो. या नवीन इलेक्ट्रिक बाईकची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, टॉर्क मोटर्सचे सर्व ग्राहक 2 वर्षांच्या कालावधीसाठी मोफत चार्जिंग नेटवर्कचा लाभ घेऊ शकतात.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन