Exciting Stunts by Land Rover in New Bond Movie; See who she is stunt driver
नव्या बॉन्डपटात Land Rover द्वारे चित्तथरारक स्टंट; पाहा 'ती' आहे तरी कोण... By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 9:54 AM1 / 9प्रसिद्ध एसयुव्ही कार निर्माता कंपनी लँड रोव्हरने डिफेंडर नावाची नवीन एसयुव्हीची एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये या कारने रोमांचित करणारी सर्व हद्द पार केल्याचे दाखविण्यात आले आहे. फोटोपाहूनच समजून जाल की यामध्ये किती खतरनाक स्टंट करण्यात आले आहेत. 2 / 9लँड रोव्हरने आगामी हॉलिवूडचा बॉन्ड पट No Time to Die ही दृष्ये घेतली आहेत. यातील एका प्रसंगात कारने 30 मीटर लांब उडी मारली आहे. 3 / 9याद्वारे Land Rover Defender किती दमदार आहे हे दिसते. या पूर्ण मुव्हीमध्ये एकूण 11 डिफेंडर एसयुव्ही वापरण्यात आल्या होत्या4 / 9या फुटेजमध्ये नवी डिफेंडर हवेमध्ये उडविताना दाखविण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे हीच कार डोंगरदऱ्यांवरून उड्या मारताना, नदी आणि चिखलातून मार्गक्रमण करताना दाखविण्यात आली आहे. 5 / 9या मुव्हीमध्ये ही कार फूल स्पीडमध्ये चालविण्यात येत असून पुढे जाऊन एसयुव्हीने पलटी मारली आहे. एवढ्यावरच न थांबता ती पुन्हा सरळ झाल्याचे दाखविण्यात आले आहे. 6 / 9व्हिडीओ पाहताना हा स्टंट जेवढा जबरदस्त वाटतो त्यापेक्षाही तो प्रत्यक्षात साहसी आहे. No Time To Die या बॉन्डपटामध्ये Lee Morrison हे स्टंट कोऑर्डिनेटर आहेत. 7 / 9त्यांच्यासोबत ऑस्कर विजेते आणि स्पेशल इफेक्ट अॅक्शन व्हेईकल सुपरवायझर क्रिस कॉर्बोल्ड हे आहेत. 8 / 9हे स्टंट कोणत्या धाडसी पुरुषाने केलेले नाहीत, तर ते एका जेसिका हॉकिन्स या महिला चालकाने केले आहेत. 9 / 9जेसिका ही Formula 3 W ची ड्रायव्हर आहे. तिची निवड मॉरिसन यांनी रेस पाहूनच केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications