शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाजारात बनावट FASTag ची विक्री; खरा कसा ओळखावा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 2:02 PM

1 / 10
NHAI कडून १५ फेब्रुवारीपासून सर्व वाहनांना FASTag वापरणे सर्वच वाहनांना बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे.
2 / 10
देशभरामध्ये फास्टॅग लागू करण्यात आला आहे. या फास्टॅगचा वापर न करणाऱ्यांकडून सरकार दुप्पट दंड वसूल करत आहे. टोलझोल रोखण्यासाठी टोलनाक्यांवर FASTag ची सक्ती करण्यात आली आहे. परंतु, बाजारात बनावट फास्टॅगची विक्री जोरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
3 / 10
टोलनाक्याच्या परिसरात तसेच ऑनलाइन माध्यमातून बिनदिक्कन FASTag च्या नावाखाली बनावट विक्री सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वाहनचालकांची फसवणूक होत असून त्यांना अनावश्यक भुर्दंड पडत आहे.
4 / 10
वाहनांसाठी FASTag खरेदी करताना, अधिकृत विक्रेते किंवा बँकर यांच्याकडूनच फास्टॅग विकत घ्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केले आहे.
5 / 10
बनावट FASTag मुळे स्कॅन न होणे, पैसे वजा न होणे असे प्रकार घडतात. फास्टॅगच्या रांगेत असल्याने वाहनचालकांना डबल टोल भरावा लागल्याचे प्रकारही उघडकीस आले आहे. अनेकदा यामुळे टोलनाक्यावर वादाचे प्रसंगही घडतात.
6 / 10
FASTag सक्तीच्या पार्श्वभूमीवर बनावट फास्टॅगही बाजारात आणण्यात आले आहेत. नामांकित कंपन्यांच्या नावाची मोठी छत्री, टेबल-खुर्ची मांडून तिथे फसवणुकीचे व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन माध्यमातूनही बनावट फास्टॅग काढले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
7 / 10
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर बनावट फास्टॅगबाबत इशारा देण्यात आला आहे. ‘वैध ऑनलाइन फास्टॅग घेण्यासाठी www.ihmcl.co.in या संकेतस्थळावर किंवा MyFAStag app येथे संपर्क साधावा, असे सांगितले जात आहे.
8 / 10
अधिकृत बँका, बँकेच्या संकेतस्थळावरून किंवा अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावेत. याची यादी ihmcl च्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन खात्री करता येऊ शकते, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
9 / 10
प्रवासादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी बनावट फास्टॅग खरेदी करू नका, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. FASTag हा देशभरातील सर्व टोल प्लाझांवर काम करतो. जेव्हा वाहनचालक टोलनाका पास करतो तेव्हा त्याला मेसेज येईलच असे नाही. काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी मेसेज येतो.
10 / 10
अधिक माहितीसाठी प्राधिकरणाचा हेल्पलाइन क्रमांक १०३३ यावर किंवा etc.nodal@ihmcl.com येथे संपर्क साधा, अशी सूचना प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळावर केली आहे.
टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाका