शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सेकंड हँड कार घेतानाचे पाच कॉमन फ्रॉड; नंतर पस्तावून काय फायदा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 4:40 PM

1 / 8
कमी बजेटमध्ये कार घेण्य़ाचे स्वप्न असते, मग लोक सेकंड हँड कार घेतात आणि फसतात. ती कार आधीच्या मालकाने कशी चालविली असेल, अपघात झालेली असेल का, मायलेज किती असेल, दुरुस्तीला येईल का यापासून अनेक प्रश्न उभे असतात. सेकंड हँड कार मार्केट सध्या जोरात सुरु आहे. नव्या कारच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत, सेकंड हँड कारच्या किंमती या तेव्हाच्या नव्या कार एवढ्याच जवळपास झाल्या आहेत. असे असताना लोकांना बजेटमध्ये आता सेकंड हँड कारच बसत आहेत.
2 / 8
सेकंड हँड कार घेताना ग्राहकांना खूप काळजी घ्यावी लागते. अनेकजण असे असतात जे वेळेवर मेन्टेनन्स करत नाहीत. मग कार मेन्टेनन्सला निघाली की विकून टाकतात. अनेकजण कारचा खूप वापर करतात, मग विकून टाकतात. प्रत्येकाची वापरलेली कार विकण्याचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. परंतू सेकंड हँड कार घेणारा फसू शकतो.
3 / 8
सेकंड हँड कार घेताना काय काय काळजी घ्यावी लागते? सेकंड हँड कार घेताना फसवणुकीचे पाच प्रकार खूपदा केले जातात. याच्याशी तुम्ही अवगत असाल तर फसवणुकीपासून वाचू शकता. अनेकदा सेकंड हँड गाडी विकताना डीलर देखील फसवणूक करतो किंवा त्याची तरी फसवणूक झालेली असते.
4 / 8
लोक ओडोमीटरवर कार किती चालविली गेली हे पाहतात. परंतू अनेकजण रीडिंग बदलतात. जास्त चाललेली कार कमी चाललीय असे दाखविले जाते. कारण त्यावर देखील गाडीची किंमत ठरते. जास्त चालली असेल तर किंमत कमी मिळते, ग्राहकही कमी मिळतात. यामुळे हे केले जाते.
5 / 8
आजही आपण अनेकदा वाचतो, चोरीच्या कार विकल्या वगैरे. घेणारा देखील फसलेला असतो. कारण हे चोर खोटे कागदपत्र बनवितात आणि ती कार विकतात. ही वाहने नवीन ग्राहकाच्या नावावरही होतात. परंतू नंतर चोर पकडला गेला की ती कारही जाते आणि पैसेही जातात.
6 / 8
एखादी कार अपघात झाला असेल किंवा बॉडीमध्ये खराबी असेल तर विमा कंपनी ती कार टोटल डॅमेज दाखविते. परंतू अशा कारही हे फसविणारे चकाचक करून विकतात.
7 / 8
हा एक असा प्रकार आहे जिथे कारचे पासिंग वेगवेगळ्या राज्यांमध्ये हस्तांतरित केले जाते. असा प्रकार गाडीची हिस्ट्री लपविण्यासाठी देखील केला जातो.
8 / 8
हा एक सर्वात प्रसिद्ध घोटाळा आहे. विक्रेता एका कारची जाहिरात करतो. परंतु तुम्ही जेव्हा खरेदीला जातो तेव्हा त्याला वेगळी (निकृष्ट) कार विकण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा जी कार तुम्हाला दाखविलेली असते ती दिली जात नाही, ती विकली गेली असे कारण दिले जाते व दुसरीच कार माथी मारण्याचा प्रयत्न होतो.
टॅग्स :carकार