शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol-CNG विसरा, आली फ्लेक्स फ्युअलवाली Maruti WagonR; पाहा काय असेल खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:10 AM

1 / 7
Wagon R Flex Fuel Car: मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोमध्ये त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार वॅगन आरचे नवीन फ्लेक्स-फ्युअल व्हर्जन (Flex Fuel Wagonr) सादर केले. ही कार नेहमीच्या वॅगनआरपेक्षा वेगळी बनवण्यासाठी खास ग्राफिक्स तयार करण्यात आले होते.
2 / 7
ही भारतातील पहिली मास-मार्केट फ्लेक्स-फ्युअल कार आहे. ही कार 20 टक्के (E20) आणि 85 टक्के (E85) इंधन दरम्यानच्या कोणत्याही इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालू शकते.
3 / 7
इंजिन इथेनॉलवर चालण्यासाठी वॅगनआरच्या पॉवरट्रेनमध्ये विविध प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. इथेनॉलचे प्रमाण तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत. इंजिन व्यवस्थापन प्रणाली अपडेट करण्यात आलेय.
4 / 7
फ्युअल पंप आणि इंजेक्टर अधिक मजबूत आहेत. इंजिनची स्थिरता सुधारण्यासाठी काही मेकॅनिकल कंम्पोनंटदेखील लावण्यात आलेत. वॅगनआर फ्लेक्स फ्युअल नियमित पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा थोडे महाग असेल. वॅगनआर पेट्रोलची सध्या एक्स-शोरूम किंमत 5.48 लाख ते 7.10 लाख रुपये आहे.
5 / 7
मारुती सुझुकीच्या म्हणण्यानुसार, वॅगन आरचे एमिशन नियमित पेट्रोल इंजिनच्या तुलनेत 79 टक्के कमी झाले आहे, तर परफॉर्मन्समध्ये कोणतीही घट झालेली नाही. कंपनीच्या मते, हॅचबॅक या वर्षी मार्चपर्यंत फ्लेक्स-फ्युअल नियमांचे पालन करेल.
6 / 7
मारुतीने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा सरकारने 20 टक्के गॅसोलीन-इथेनॉल मिश्रित फ्युअलचे रोल-आउट या वर्षी 1 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. फ्लेक्स फ्युएल मारुती वॅगनआरमध्ये 1.2L नॅचरल एस्पिरेटेड इंजिन देण्यात आले आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सही देण्यात आलाय.
7 / 7
“आम्ही आमची फ्लेक्स फ्युअल कार आणण्यासाठी तयार आहोत. परंतु अशाप्रकारचं इंधन भारतात पूर्णपणे सहजरित्या उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आम्हाला व्यावसायिकरित्या उत्पादन सुरू करणं कठीण असेल,” अशी प्रतिक्रिया मारुती सुझुकीचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर हिसाशी ताकेची यांनी दिली.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी