शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Thar-Jimny विसरा; Tata कडे आहे 'ही' खास गाडी, 9 लोकांना आरामात बसता येणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 8:08 PM

1 / 6
Tata Defence Car: देशात महिंद्रा थार (Mahindra Thar) ला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली आहे. यातच आता मारुती जिम्नी (Maruti Jimny) कडेही ग्राहक आकर्षित होत आहेत. नुकतीच लॉन्च झालेल्या मारुती जिम्नीला आतापर्यंत 15,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाल्या आहेत.
2 / 6
या दोन्ही गाड्या ऑफरोडिंगसाठी उत्तम आहेत. पण, खूप कमी लोकांना माहितीये की, टाटा मोटर्स (Tata Motors) कडेही एक दमदार 4X4 फीचर असलेली ऑफ रोडिंग गाडी आहे. विशेष म्हणजे, या गाडीत तब्बल 9 लोकांना बसता येते.
3 / 6
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल आणि कमर्शियल व्हीकलसोबतच डिफेंससाठी काही खास गाड्या तयार करते. यात आर्मर्ड व्हीकल, माइन प्रोटेक्टेड व्हीकल, पिकअप ट्रक, लॉजिस्टिक मिलिट्री व्हीकल, कॉम्बॅट व्हीकलसारख्या गाड्या आहेत.
4 / 6
मोठी गोष्ट म्हणजे, फक्त भारतीय सैन्यातच नाही, तर इतर देशातील सैन्यामध्येही या गाड्यांचा वापर केला जातो. यातील एक गाडी आहे Xenon DC 4X4. ही एक डिफेंस ट्रूप कॅरिअर म्हणजेच सैनिकांना घेऊन जाणारी गाडी आहे.
5 / 6
ही गाडी हार्ड टॉप आणि सॉफ्ट टॉप, अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात एकूण 9 लोकांना बसता येते. पुढए दोन सैनिक, मध्ये तीन सैनिक आणि पाठीमागच्या बाजुला 4 सैनिकांना बसण्याची जागा आहे. कारमध्ये 2956cc चे 4 सिलिंडर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 112hp पॉवर आणि 300NM टॉर्क जनरेट करते.
6 / 6
यात 4X4 फिचरदेखील आहे. या फिचरमुळे अवघड रस्त्यांवरही गाडी आरामात चालू शकते. यात पॉवर स्टीअरिंग आणि 3150mm व्हीलबेस आहे. तुम्हाला ऐकून वाईट वाटेल पण, ही गाडी सामान्यांसाठी उपलब्ध होत नाही. ही खास गाडी फक्त सैन्यासाठीच तयार केली जाते.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनMahindraमहिंद्राMaruti Suzukiमारुती सुझुकीDefenceसंरक्षण विभाग