शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Alto पासून Audi पर्यंत नव्या वर्षी महागणार कार्स, ५ कंपन्यांनी घेतला किंमती वाढवण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 2:14 PM

1 / 7
नव्या वर्षातही महागाई आपली पाठ सोडणार नसल्याचं दिसून येतंय. जर नव्या वर्षात तुमचा कार खरेदी करण्याचा विचार असेल तर आतापासूनच तुम्ही तुमचं बजेट वाढवा. नव्या वर्षात पुन्हा एकदा कार कंपन्या आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. सामान्यांच्या कार्सपासून अगदी लक्झरी कार्सपर्यंत गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत.
2 / 7
१ जानेवारीपासून अनेक कंपन्या आपल्या कार्सच्या किंमती वाढवणार आहेत. यामध्ये सर्वांची आवडती मारुती ऑल्टोपासून लक्झरी कार ऑडी यांचाही समावेश आहे. जाणून घेऊया यात कोणत्या कार्सचा समावेश आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये वाढणाऱ्या किंमतींचं कारण कंपन्यांनी दिलं आहे. तसंच सध्या चिपचंही संकट आहे.
3 / 7
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनं (Maruti Suzuki Car Price Hike) आपल्या सर्वच कार्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेलनुसार ठरवली जाईल. कंपनी Alto, Alto K 10, Baleno, Brezza, Celerio, Ciaz, Dzire, Eeco, Ertiga, Grand Vitara, Ignis, S-Presso, Swift, Wagon R आणि XL6 च्या किमती वाढवणार आहे.
4 / 7
त्याचप्रमाणे Tata Motors ने देखील जानेवारी 2023 पासून (Tata Motors Car Price Hike) किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये Altroz, Harrier, Nexon, Nexon EV, Punch, Safari, Tiago, Tiago EV, Tigor आणि Tigor EV सारख्या कारचा समावेश असू शकतो.
5 / 7
याशिवाय किआ इंडियादेखील आपल्या कार्सच्या किंमतीत जानेवारी 2023 पासून (Kia India Car Price Hike) कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संपूर्ण रेंजच्या किंमतीत 50 हजारांची वाढ होणार आहे. ही वाढ 31 डिसेंबर 2022 नंतर करण्यात येणाऱ्या सर्व बुकिंग्सवर लागू होणार आहे.
6 / 7
तर दुसरीकडे लक्झरी कार कंपनी ऑडीदेखील 1 जानेवारीपासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत 1.7 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. तर लक्झरी कार कंपनी मर्सिडीज बेंझनंही (Mercedes Benz Car Price Hike) किंमतीत 5 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केलीये.
7 / 7
याशिवाय रेनो इंडियानंदेखील आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, कोणत्या कारच्या किंमतीत किती वाढ होणार आहे, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. एमजी मोटर्सनंही आपल्या मॉडेल आणि व्हेरिअंटनुसार कारच्या किंमतीत दोन तीन टक्क्यांनी किंमतीत वाढ करेल.
टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकी