शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Geely Panda: १५० किमी रेंज असणारी मिनी इलेक्ट्रिक कार लॉन्च; किंमत ५ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 1:13 PM

1 / 11
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. वाहन उत्पादक देखील या सेक्टरमध्ये नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यास सुरुवात करत आहेत. त्यातच चीनमधील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक Geely ने देशांतर्गत बाजारात नवीन मिनी इलेक्ट्रिक कार Geely Panda लाँन्च केली आहे.
2 / 11
अतिशय आकर्षक लूक आणि क्यूट डिझाईन असलेल्या या कारची एकूण लांबी फक्त ३ मीटर आहे आणि विशेष म्हणजे यात चार जणांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चिनी बाजारपेठेत छोट्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे, त्यामुळेच कंपनीने आपला नवीन पांडा समोर आणला आहे.
3 / 11
Geely Auto ही चिनी बाजारपेठेतील एक प्रसिद्ध कंपनी आहे आणि व्होल्वो कार्स, लोटस कार्स, लंडन इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी आणि कियानजियांग मोटरसायकल यांसारख्या आघाडीच्या ब्रँडची मूळ कंपनी आहे.
4 / 11
सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की Geely Panda ला जियोमेट्री ब्रँड अंतर्गत लॉन्च केले जाऊ शकते. परंतु शेवटी ते मूळ कंपनीकडून मॉडेल म्हणून लॉन्च केले गेले आहे. नवीन मिनी इलेक्ट्रिक कारबद्दल बोलायचे झाले तर, पांडाप्रमाणेच काळ्या-पांढऱ्या रंगानं ही कार बनवली आहे.
5 / 11
यात काळे छत, राऊंड हेडलाइट्स, दोन दरवाजे, चार सीट आहेत. या छोट्या कारची लांबी फक्त 3,065 मिमी आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी लहान जागेतही ती सहज पार्क करू शकता. याशिवाय जड वाहतूक असलेल्या शहरांमध्येही ते सहज चालवता येते.
6 / 11
लांबीमध्ये, ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेल्या टाटा नॅनोपेक्षाही लहान आहे, ज्याची लांबी 3099 मिमी होती. त्यावरून तुम्हाला या कारच्या लांबीची चांगली कल्पना येऊ शकते. भलेही ही कार छोटी आहे परंतु कंपनीं भन्नाट फिचर्स दिले आहेत.
7 / 11
कारला पॅनोरामिक काचेचे रुफ देखील मिळते आणि चाकांना पांडाच्या पायाचे ठसे सुशोभित केले गेले आहेत. कारच्या पुढील बाजूस तळाशी काळे अॅक्सेंट मिळतात, जे पांडाच्या कानासारखे दिसतात. एकूणच, डिझाईनच्या बाबतीत कंपनीने या कारला एक क्यूट लुक दिला आहे.
8 / 11
पांडा मध्ये, कंपनीने 30kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आणि LFP बॅटरी पॅक दिला आहे, जो चीनी कंपनी गुओक्सुआन हाय-टेकने तयार केला आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये १५० किलोमीटरचा प्रवास करण्यास सक्षम आहे.
9 / 11
सिटी कार म्हणून, हा एक चांगला पर्याय मानला जातो, जो दैनंदिन गरजा लक्षात घेऊन कमी अंतरासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कारला 9.2-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते आणि अतिरिक्त 8-इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो सेंटर नियंत्रण स्क्रीन म्हणून स्थित आहे.
10 / 11
ब्लूटूथ फोन कनेक्टिव्हिटी, इंटरकॉम फंक्शन, डेस्टिनेशन शेअरिंग यांसारख्या फीचर्सही यात आहेत. अधिकृत मोबाइल अॅपद्वारे तुम्ही एअर कंडिशन (AC), ट्रंक आणि कारचे इतर अनेक गोष्टी रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करू शकता. याशिवाय तुम्ही मोबाईल फोनवरूनच कार लॉक आणि अनलॉक करू शकता.
11 / 11
Geely Panda ला दोन ड्रायव्हिंग मोड मिळतात, ज्यात Sport आणि Normal यांचा समावेश होतो. त्याचे एकूण वजन ७९७ किलो आहे आणि कारचा टॉप स्पीड १०० किमी प्रतितास आहे. याची किंमत ४० हजार ते ५० हजार युआन (चिनी चलन) दरम्यान आहे, जी भारतीय चलनात सुमारे ५ लाख रुपये आहे.