शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATAच्या 'या' फॅमिली कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट, किंमत 6 लाखांपेक्षा कमी; जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:42 AM

1 / 7
टाटा मोटर्सने आपल्या टाटा टियागोवर भरघोस सूट जाहीर केली आहे. तुम्हाला ही ऑफर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी डिस्काउंटच्या स्वरुपात मिळू शकते.
2 / 7
कंपनीने दिलेल्या ऑफर अंतर्गत ग्राहकांची या कारवर 28,000 रुपयांपर्यंतची मोठी बचत होऊ शकते. चला या विशेष ऑफरबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ.
3 / 7
Tata Motors या महिन्यात Tata Tiago मॉडेलवर 28,000 रुपयांपर्यंत प्रचंड सूट देत आहे. यावर कंपनीकडून 10000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
4 / 7
ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, तसेच विविध राज्ये आणि डीलरशिपवर ऑफरमध्ये काही बदल असू शकतो. दरम्यान, टाटा टियागो सीएनजी मॉडेलवर कंपनीकडून कोणतीही सूट दिली जात नाहीये.
5 / 7
Tata Tiago कार सुमारे 20.09 kmpl चा उत्कृष्ट मायलेज देते. तसेच, या कारची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 5.19 लाख रुपये आहे.
6 / 7
या Tiago सोबत कंपनीने 1.2-लीटर तीन-सिलेंडर रेवेट्रॉन पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 86HP आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या कारमध्ये मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय दिले आहेत.
7 / 7
टाटा टियागोची लांबी 3765 मिमी, रुंदी 1677 मिमी आणि उंची 1535 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2400 मिमी आहे. यात 35 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार