शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ ६८ हजारांत घेऊन जा Hyundai ची बेस्ट सेलिंग कार, पाहा किती असेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 9:51 AM

1 / 7
Hyundai Santro Asta Down Payment Loan EMI : जर तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक कार्सची मागणी वाढत आहे. मारूती आणि ह्युंदाईच्या हॅचबॅक कार्स सर्वांच्याच पसंतीस उतरतात. उत्तम इंजिन आणि मायलेजमुळे ग्राहक या गाड्यांना पसंती देतात.
2 / 7
भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक सेगमेंटमध्ये कमी बजेचच्या कार्सची मोठी यादी उपलब्ध आहे. यामध्ये उत्तम मायलेज आणि फीचर्सही मिळतात. मारूती, टाटा, ह्युंदाई या कंपन्यांचा या सेगमेंटमध्ये बोलबाला आहे. या सेगमेंटमध्ये ह्युंदाईटी सँट्रो अॅस्टा ही बेस्ट सेलिंग कार ठरत आहे.
3 / 7
किंमतीशिवाय ही कार आपल्या मायलेज आणि डिझाईनसाठी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या कारची एक्स शोरूम किंमत ६ लाखांपेक्षा अधिक असली तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही केवळ ७० हजार रूपयांच्या डाऊन पेमेंटवर ही कार तुमच्या घरी नेऊ शकता.
4 / 7
सोप्या फायनॅन्स प्लॅन्सच्या मदतीनं ही कार तुमची होई शकते. जर तुम्हाला ह्युंदाई सँट्रो अॅस्टा विकत घ्यायची असेल तर त्यासाठी किती डाऊनपमेंट लागेल, किती कर्ज उपलब्ध होईल आणि ईएमआय किती पडेल याची माहिती आपण पाहणार आहोत.
5 / 7
ह्युंदाई सँट्रो अॅस्टाची एक्स शोरूम किंमत (दिल्ली) 6,00,700 रुपये आहे. तर ऑनरोड या कारची किंमत 6,82,998 रूपयांपर्यंत जाते. डाऊनपेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार ही कार तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला यासाठी 6,14,998 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. यासाठी तुम्हाला 68000 रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागेल. यानंतर तुमचा महिन्याचा ईएमआय 13,006 रूपये असेल.
6 / 7
यासाठी तुम्हाला साठ महिन्यांचा म्हणजेच पाच वर्षांचा कालावधी मिळेल. पाच वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदरानं तुम्हाला 13,006 रुपयांचा ईएमआय बसेल. पाच वर्षांमध्ये तुम्हाला एकूण 7,80,360 रुपये भरावे लागतील. एकूण पाच वर्षांच्या कालावधीत तुमच्याकडून बँक 1,65,362 रुपये व्याज आकारेल.
7 / 7
ह्युंदाई सँट्रो अॅस्टामध्ये कंपनीनं 1086 सीसीचं इंजिन दिलं असून ते 68.05 पीएस पॉवर आणि 99 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसंच यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आलाय. याशिवाय या कारमध्ये मल्टी फंक्शनल स्टिअरिंग व्हिल, टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ससारखे फीचर्स देण्यात आलेत. ही कार 20.3 किमी पर्यंतचं मायलेज देते.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन