शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मांढरदेवीचा घाटरस्ता, त्यात रस्त्याची कामे, पाऊस आणि त्यात स्कोडा कुशक माँटे कार्लोचा फिल...

By हेमंत बावकर | Published: July 03, 2024 1:11 PM

1 / 9
एखादी प्रिमिअम एसयुव्ही आपल्याकडे असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही वर्षांपूर्वी एखादी कार असावी ते आता स्टेटसला शोभेल अशी, चारचौघांत उठून दिसेल अशी कार हा प्रवास साधासुधा नव्हता. आजही अनेक कंपन्या ग्राहकांच्या सेफ्टीकडे पाहत नाहीत. काही कंपन्यांनी हे मनावर घेतले आहे. यात स्कोडाही आहे. स्कोडाची कुशक ही अनेकांच्या मनातील कार आहे. या कारची माँटे कार्लो एडिशन आम्ही चालवून पाहिली.
2 / 9
पुण्यातील ऑफिस टाईमचे ट्रॅफिक, मांढरदेवीचा घाट अशी सुमारे ३०३ किमी ही कार चालविली. खड्डे, वळणांवरील बॅलन्स, मायलेज आणि फिचर्स आदी गोष्टी यावेळी विचारात घेण्यात आल्या. यावेळी उन् पावसाचा खेळही सुरु होता. त्यात घाटात गेल्यावर धुके तर तुफान होते. म्हणजे १०-१५ फुटांवर काहीच दिसत नव्हते. मांढरदेवीला जाताना रस्त्याची कामेही सुरु होती. पावसामुळे चिखलाचा रस्ता देखील निसरडा झाला होता. त्यात ही पेट्रोल कार, पिकअप घेईल का, असा मनात संशय येत होता.
3 / 9
तर या कारने कुठेही आम्हाला पिकअपसाठी त्रास दिला नाही. अचानक जरी चढ आला तरी 7 स्पीड एटोमॅटीक गिअरबॉक्स असल्याने गिअर चेंज होतानाचा पिकअप लॉस किंवा धक्का जाणवला नाही. इंजिनचा आवाजही आतमध्ये फार कमी येत होता. सिग्नलला तर इंजिन बंद झालेय की चालू आहे हे देखील समजत नव्हते, एवढा नॉईस कमी करण्यात आला आहे. इंधन वाचविण्यासाठी सिग्नलवर किंवा कार आयडिअल थांबली तर इंजिन स्टार्ट-स्टॉप फंक्शन देण्यात आले आहे.
4 / 9
लूकमध्ये ही कार लोकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. अंतर्गत फिचर्सही चांगले देण्यात आलेले आहेत. व्हेंटिलेटेड सीट, आतमध्ये प्रशस्त जागा, ४-५ दिवसांच्या लाँग ट्रीपच्या लगेजसाठी मोठी बुट स्पेस, २५.४ सेमी मोठी इन्फोटेन्मेंट सिस्टीम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटीक एसी कंट्रोल आदी फिचर्स देण्यात आली आहेत.
5 / 9
सुरक्षेसाठी ६ एअरबॅग आणि १० हून अधिक सुरक्षा फिचर्स देण्यात आली आहेत. या कारची बिल्टक्वालिटी देखील चांगली आहे. यामुळे ही कार फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देणाऱ्या कारच्या यादीत आहे. कंफर्टचा विचार केला तर सीटचे कुशनिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीचे आहे. आतील फायबरही चांगले वापरण्यात आले आहे.
6 / 9
कारमध्ये चांगल्या प्रकारचे सस्पेंशन आहे. तुम्हाला खड्डे, रस्त्यावरील पॅच आदींचा धक्का जाणवत नाही. तसेच धाड-धाड असा टायरचा खूप मोठा असा आवाजही येत नाही. ड्रायव्हरसाठी बाहेर सर्व दिशांना पाहण्याच्या चांगला व्ह्यू मिळतो. बंपी रोडवर हालेडुलेही होत नाही. चांगल्या क्वालिटीचे इंटेरिअर, दरवाजा उघडतानाचे फिल तुम्हाला ही कार दणकट असल्याची भावना देते.
7 / 9
या कारमध्ये १.५ लीटरचे इंजिन आहे. या इंजिनने सरासरी ११.६ किमी प्रति लीटरचे मायलेज दिले. यात खूपच ट्रॅफिक असेल तर ५-६ किमी, मध्यम ट्रॅफिक असेल तर ८-९ किमी आणि ३५-४० च्या स्पीडने तुम्ही शहरातून जाऊ शकत असाल तर तिथे ११-१२ किमीचे मायलेज दिले. हायवेला १५ ते १७ चे मायलेज दिले. तसेच घाटात चढणीला १३ किमीचे मायलेज दिले.
8 / 9
केबिन इन्सुलेशन एकदम आतमध्ये शांतता देणारे होते. बाहेरच्या गाड्यांचा आवाज, गोंगाट, हॉर्नचे आवाज आदी आतमध्ये खूप कमी ऐकायला येत होते. यामुळे आरामदायी प्रवास हा या एसयुव्हीचा युएसपी वाटला. पाठीमागच्या प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स आणि टाईप सी युएसबी चार्जिंग देण्यात आलेले आहे. तसेच पाठीमागच्या सीटवर सेंटर आर्मरेस्ट, त्यात छोटी बॉटल ठेवण्यासाठी होल्डर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. एका फॅमिली कारमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. कारच्या चारही दरवाजांमध्ये एकेक लीटरच्या पाण्याच्या बॉटल राहतील, त्याहून जास्त स्पेस देण्यात आली आहे.
9 / 9
म्युझिक सिस्टिमचा आवाज चांगला वाटला, परंतू काहीवेळी स्पीकर थर्रर्र असा आवाज करत होते. कारमध्ये सनरुफही आहे. आतील कव्हर हे जाड असल्याने बाहेरील उन्हामुळे आतील उष्णता वाढत नाही. यामुळे डोक्यालाही उष्णता लागत नाही. प्रिमिअम फिल हवा असेल, इतरांपेक्षा वेगळी कार हवी असेल, फॅमिली पॅकेज देणारी कार हवी असेल तर स्कोडा कुशक हा चांगला पर्याय आहे. सस्पेन्शन चांगले आहे, यामुळे लांबच्या प्रवासाला थकायला होत नाही. पिकअप चांगला असल्याने व केबिन सायलंट असल्याने कसला त्रासही जाणवत नाही.
टॅग्स :Skodaस्कोडा