शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Auto Expo 2023: जबरदस्त! TATA नं एक्सपो 2023 मध्ये सादर केली ही कर्व्ह इलेक्ट्रिक SUV; ढासू आहेत फीचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 8:20 PM

1 / 9
टाटा मोटर्सने (Tata Motor) ऑटो एक्सपो 2023 मध्ये हॅरियर ईव्ही, सिएरा ईव्ही आणि अविन्या या कार आज लाँच केल्या. एप्रिल 2022 मध्ये शोकेस केलेली इलेक्ट्रिक SUV Curve ही कारही आज सादर केली.
2 / 9
टाटा मोटर्सने नवीन ब्लेझ रेड पेंट स्कीममध्ये कर्व्ह सादर केली. याशिवाय मॉडेलमध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही.
3 / 9
ही कार बाहेरून, स्लिम एलईडी डीआरएल आणि त्रिकोणी हेडलॅम्प डिझाइन आहे. यासोबत फ्लोटिंग बोनेट देण्यात आले आहे, जे आतमध्ये हवा कायम ठेवते. मॉडेलला आकर्षक लूक देण्यासाठी त्याची उंची ठेवण्यात आली आहे. यात फ्लॅट डोअर हँडल, एरो-डिझाइन व्हील आणि क्लॅडिंग मिळते.
4 / 9
रेड थीम आतील भागातही वापरण्यात आला आहे. डॅशबोर्डमध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह मांडणी आहे. स्टीयरिंग व्हील रेड कलरमध्ये दिले आहे. मोठ्या पॅनोरामिक काचेचे छप्पर मागील स्पॉयलरसह रूफलाइनला देण्यात आले आहे. त्यामुळे केबिनमध्ये भरपूर लाईट दिसणार आहे.
5 / 9
ICE इंजिनचा पर्याय मिळवून सर्व-इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमध्ये कर्व्ह यात पहिल्यांदाच देण्यात आली आहे.या ईव्हीची ड्राइव्ह रेंज सुमारे 400 किमी असेल, असा कंपनीने दावा केला आहे.
6 / 9
टाटाच्या अविन्‍य कन्‍सेप्‍ट, जनरेशन 3 आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेल्‍या प्‍युअर इलेक्ट्रिक वेईकलची अभिव्‍यक्‍ती – गतीशीलतेची नवीन टायपोलॉजी सादर, जी एैसपैस जागा व आरामदायीपणाची खात्री देते.
7 / 9
कन्‍सपेट कर्व्‍हचे आयसीई व्‍हर्जन, एसूयव्‍हीच्‍या प्रबळ आकर्षततेचा समावेश असण्‍यासह आकर्षकता, कार्यक्षमता व व्‍यावहारिकतेचे परिपूर्ण संतुलन करते.
8 / 9
अल्‍ट्रोज रेसर आणि टियागो.ईव्‍हीच्‍या स्‍पोर्टी व्‍हर्जनसह पल्‍स रेसिंगचा अनुभव घ्‍या, तसेच दमदार ऑन-रोड उपस्थितीसह या अवतारांचा ड्राइव्‍ह करण्‍याचा आनंद घ्‍या.
9 / 9
अल्‍ट्रोज रेसर आणि टियागो.ईव्‍हीच्‍या स्‍पोर्टी व्‍हर्जनसह पल्‍स रेसिंगचा अनुभव घ्‍या, तसेच दमदार ऑन-रोड उपस्थितीसह या अवतारांचा ड्राइव्‍ह करण्‍याचा आनंद घ्‍या.
टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2023TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कार