शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google Maps ला एका कलाकाराने हॅक केले; कोंडी दिसल्याने वाहतूकच वळली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 3:34 PM

1 / 7
जगाला दिशा दाखविणारी गुगल नुकतीच तोंडघशी पडली आहे. तसे हा प्रकार मुंबईत बऱ्याचदा घडलेला आहे. मात्र, हा प्रकार परदेशात घडल्याने त्याची वाच्यता झाली आहे. धक्कादायक म्हणजे एका कलाकाराने गुगलला गुंगारा दिला आहे.
2 / 7
मुंबईत गुगल मॅपवरून मार्गक्रमण करताना अनेकदा तो रस्ता लाल रंगामध्ये दिसतो. मात्र, पुढे गेल्यावर त्या ठिकाणी रस्त्याच्या आजुबाजुला वाहने लावलेली असल्याने खूप वाहने असल्याचे दिसते पण रस्ता मोकळाच असतो. असाच काहीसा प्रकार घडला आहे. सिमॉन वेकर्टने गुगल मॅपला हॅक करून दाखविले आहे. यासाठी त्याने जास्त काही नाही तर एकाचवेळी 99 स्मार्टफोन जवळ बाळगले होते.
3 / 7
खरेतर गुगल रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या मोबाईलचा डेटा गोळा करत असते. या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप वापरात असतो. यानुसार वाहनाचा वेग लक्षात घेतला जातो आणि त्यानंतर मागाहून येणाऱ्या लोकांना तिथे ट्रॅफिक असल्याचे दाखवून दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविले जाते. याच गुगलच्या फॉर्म्युल्यासोबत सिमॉनने छेडछाड केली आहे.
4 / 7
सिमॉनने एका बास्केटमध्ये 99 मोबाईल घेतले. यामध्ये इंटरनेट आणि गुगल मॅप सुरू ठेवले. यानंतर सिमॉन एका कमी वर्दळीच्या रस्त्यावरून हळू हळू चालत जाऊ लागला. सिमॉनच्या या प्रँकला गुगलने ट्रॅफिक समजले आणि तो रस्ता वापरणाऱ्यांना दुसरा रस्ता सुचविला.
5 / 7
गुगलचा मॅप हा जगभरात प्रसिद्ध आहे. ट्रॅफिक आणि रस्त्याची माहिती दाखवत युजरना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविले जाते. भारतात रेड, ब्ल्यू आणि यलो रंगात ट्रॅफिक दाखविले जाते. रेड म्हणजे मोठी कोंडी, यलो म्हणजे हळू हळू जाणारी वाहतूक आणि ब्लू म्हणजे रस्ता रिकामा असल्याचे दर्शविले जाते. रोड बंद झाला असेल तर गुगल युजरना नवा रस्ता सुचविते.
6 / 7
आजकाल युजर रस्ता माहिती असूनही गुगल मॅपचा वापर करतात. कारण त्यांना रस्त्याची रिअल टाईम माहिती मिळावी. मात्र, अशी ट्रीक पुन्हा कोणी वापरल्यास वाहनचालकांना त्रास मात्र जरूर होणार आहे.
7 / 7
. एखाद्या वाईट कृत्यासाठीही ही ट्रीक वापरता येऊ शकते. यामुळे हा एकप्रकारे गुगलला दिलेला इशाराच आहे.
टॅग्स :googleगुगलAutomobileवाहनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल