शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुगल मॅप इंधन वाचविणार! कसे ते पहा, अमेरिका, युरोपमध्ये मिळतेय हे फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 4:30 PM

1 / 6
वाहतूक कोंडीमध्ये किंवा खूपच स्पीडने गाडी चालविल्याने इंधन मोठ्या प्रमाणावर जाळले जाते. यावर गुगलवर या समस्येचे उत्तर आहे, असे जर कोणी सांगितले तर तुम्ही सर्च कराल ना? अनेकजण करतील. परंतु, खरोखरच यावर आपल्याकडे इंधन वाचविण्याचे उत्तर आहे, असा दावा गुगलने केला आहे.
2 / 6
गुगलने नवीन फीचर आणले आहे, ज्यामुळे वाहन चालकांचे इंधन वाचणार आहे. सध्या हे फीचर मोजक्या देशात मिळू लागले आहे. पण भारतात ते लवकरच मिळेल असेही सांगितले जात आहे. या फीचरमुळे तुम्हाला इंधन वाचविण्यासाठी ऑप्शनल रुटची निवड करण्यास मदत मिळणार आहे. ही सेवा हायब्रिड आणि इलेक्ट्रीक वाहनांनाही मिळणार आहे.
3 / 6
गुगल मॅप्सवर याची सेवा मिळणार आहे. तुम्ही प्रवास करत असताना फ्युअल एफिशिअंट मार्गाचा पर्याय निवडता येणार आहे. यासाठी गुगल मॅपच्या अॅपमध्ये सेटिंगमध्ये जात काही बदल करावे लागणार आहेत. सध्या हे फीचर अमेरिका, कॅनडासह युरोपीय देशांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
4 / 6
या फीचरद्वारे वाहनाच्या इंजिनाचा प्रकार निवडावा लागतो. यानुसार एनर्जी इफिशिअंट मार्ग दाखविला जातो. यासाठी रस्त्याची परिस्थिती आणइ वाहतूक आदी गोष्टींचा विचार करून इंधन वाचविण्यावर भर दिला जातो. हे फीचर सर्वात वेगवान रस्त्याऐवजी पर्याची इंधन वाचविणारा मार्ग सुचविते. यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांना चार्ज करण्यासाठी थांबणे विचारात घेतलेले नाहीय.
5 / 6
यामध्ये एखाद्या मार्गावरून जाताना सरासरी इंधन खपत, डोंगर, चढ-उतार, थांबणे आणि ट्रॅफिक पॅटर्न आणि रस्त्यांचे प्रकार आदी विचारात घेण्यात येतात. अमेरिकेत पर्यावरण विभागाकडून गुगल आकडेवारी घेते, त्यानुसार या मार्गांची निवड करते.
6 / 6
भारतात ते कितपत शक्य आहे, याची काहीही कल्पना नाहीय. कारण भारतात एवढा शक्तीशाली पर्यावरण विभाग नाहीय किंवा तेवढ्या चांगल्या परिस्थितीचे रस्ते. या सर्वांचा अभाव पाहता गुगलला वेगळे पर्याय शोधावे लागणार आहेत.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल