govt to plan tax rebate of upto 25 percent on new car under vehicle scrappage policy
Scrappage Policy: नवी कार खरेदी करण्यावर मिळणार करात २५ टक्क्यांची सूट?; फक्त 'इतकंच' करावं लागेल By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:37 AM1 / 15नवीन प्रवासी आणि व्यावसायिक वाहन खरेदी केल्यावर १ ऑक्टोबरपासून तुम्हाला रोड टॅक्समध्ये मोठी सूट मिळू शकते. वाहन स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत केंद्र सरकारने एक प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. 2 / 15या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार वाहन स्क्रॅपिंग प्रमाणपत्र असलेल्या नवीन वाहन खरेदीदारास मोटार व्हेईकल टॅक्सवर २५ टक्के पर्यंत सूट देण्यात येईल. 3 / 15काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं संसदेत स्क्रॅपेज पॉलिसीची घोषणा केली होती. ही पॉलिसी १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 4 / 15तसंच सरकारनं यासंदर्भात ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करून सूचनादेखील मागवल्या आहेत.5 / 15मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, तुम्हाला एखादे प्रवासी वाहन खरेदीस स्क्रॅपिंग प्रमाणपत्रासह २५ टक्के सवलत आणि व्यावसायिक वाहन खरेदी केल्यानंतर १५ टक्के सूट मिळू शकते. 6 / 15सरकारच्या अधिसूचनेनुसार व्यावसायिक वाहनाला ८ वर्षांसाठी करात सूट मिळणार आहे. तर वैयक्तिक वाहन खरेदी केल्यास यावर रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून १५ वर्षांसाठी टॅक्समध्ये सूट मिळेल. 7 / 15या प्रकरणी सरकारनं ३० दिवसांच्या सर्व सूचना मागवल्या आहेत. तसंच कोणीही जर आपली १५ वर्षांपेक्षा जुनी कार स्क्रॅप करू इच्छित असेल तर त्याला व्हेईकल स्क्रॅपिंग सर्टिफिकेट देण्यात येईल.8 / 15वाहन नोंदणी संपल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपलं वाहन फिटनेस सेंटरमध्ये नेणं अनिवार्य आहे.9 / 15या पॉलिसीमध्ये असेही म्हटले आहे की जर खासगी आणि व्यावसायिक वाहने १५ किंवा २० वर्षांनंतर फिटनेस टेस्टमध्ये अयशस्वी झाली तर वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण केले जाणार नाही. 10 / 15नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी वाहनमालकाला त्या जागी त्यांचं वाहन स्क्रॅप करण्यास प्रोत्साहित केलं जाईल.11 / 15नोंदणीचं नूतनीकरणासाठी अधिक शुल्क आकारलं जाईल, जेणेकरुन जुन्या ऐवजी नवीन वाहन खरेदी करण्यास लोकांना प्रोत्साहित करता येईल. 12 / 15स्क्रॅपिंग पॉलिसी सुलभ करण्यासाठी देशभर स्वयंचलित फिटनेस सेंटर तयार केली जातील. जी वाहनं स्क्रॅप करण्यात येतील त्या वाहनांच्या भागांना रिसायकल केलं जाईल.13 / 15 यामुळे कंम्पोनन्ट्सच्या किंमती कमी होण्यासही मदत मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. स्क्रॅप व्हॅल्यू ही ४ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान असेल जी वाहनाच्या मालकांना वाहन स्क्रॅप करण्यावर देण्यात येईल. 14 / 15तसंच या पॉलिसी अंतर्गत रोड टॅक्सवर २५ टक्के सूट देण्याचा प्रस्तावही सरकारनं दिला आहे. 15 / 15स्क्रॅप सर्टिफिकेट दाखवून नवी कार खरेदी केल्यास कार उत्पादकांनाही पाच टक्के सूट देण्यास सांगण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications