शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टेअरिंगला मधोमध पकडाल तर हात मोडेल; वाहन चालविण्याची योग्य पोझिशन कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 5:20 PM

1 / 6
कारचे स्टेअरिंग कसे पकडावे याची अनेकांना माहिती नसते. अनेकजण स्टेअरिंगच्या मधोमध हॉर्नवर हात पकडतात. परंतु हे धोक्याचे आहे. असे करणे त्यांना स्टायलिश वाटते परंतु हाडे मोडू शकतात. याचे कारणही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 6
चालकाच्या सुरक्षेसाठी स्टिअरिंगमध्ये एअरबॅग दिलेली असते. अपघात झालाच तर चालकाचे तोंड स्टेअरिंगवर आदळून जखमी होऊ नये यासाठी ही एअरबॅग दिलेली असते. परंतु जर चालकाने तिथेच हात ठेवला आणि अपघात घडला तर सेकंदाच्याही काही भागांत एअरबॅग वेगाने बाहेर येते. यामुळे हातावर तिचा आघात होण्याची शक्यता वाढते.
3 / 6
एअरबॅग आदळल्याने हाताचे हाड मोडण्याची शक्यता असते. एअरबॅग सुरक्षेसाठी असली तरी अनेकांच्या नाकाला वगैरे दुखापत झाल्याचे अपघातांमध्ये समोर आले आहे.
4 / 6
जेव्हा एअरबॅग उघडते तेव्हा तेथील प्लॅस्टिक फोडून शेकडो किमीच्या वेगाने ती बाहेर पडते. जेव्हा तुमचा हात त्यावर असते तेव्हा ते प्लॅस्टिकही तुम्हाला खोलवर दुखापत करू शकते. अनेकांना हे काहीतरीच काय असे वाटेल, परंतु याकडे दुर्लक्ष करू नका. याशिवाय अन्य दुष्परिणाम आहेत.
5 / 6
कारच्या स्टिअरिंगच्या मधोमध हात धरल्याने कारवरील कंट्रोलही कमी होतो. यामुळे अपघाताची शक्यता वाढते. अचानक कारचे स्टेअरिंग वळवायचे असल्यास वेळ लागतो. यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच जास्त थकायलाही होते.
6 / 6
स्टेअरिंग पकडण्याचा योग्य प्रकार हा दोन्ही हातांची घडाळ्याची ९ वाजता आणि ३ वाजताची पेझिशन आहे. या पोझिशनमध्ये तुम्ही चांगल्याप्रकारे कारवर कंट्रोल ठेवू शकता व चटकन स्टेअरिंग वळवू शकता.