शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त लूक अन् किंमतही कमी; Bajaj ने लॉन्च केली बहुप्रतिक्षित Pulsar N250, पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 2:56 PM

1 / 6
New Bajaj Pulsar N250 Price & Features: भारतातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bajaj ने आपली बहुप्रतिक्षित नवीन 2024 Pulsar N250 लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची किंमत 1,50,829 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित केली असून, विविध शहरातील किमतीत फरक असू शकतो. बाजारात या बाईकची TVS Apache RTR 200 4V, Honda Hornet आणि Suzuki Gixxer 250 शी थेट स्पर्धा असेल. या बाईखच्या किमती रु. 1.42 लाख ते रु. 1.98 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहेत.
2 / 6
बजाजने आपल्या नवीन Pulsar N250 ला तीन नवीन रंगांमध्ये लॉन्च केले आहे, यात काळा, लाल आणि पांढऱ्या रंगाचा समावेश आहे. तसेच, या बाईकमध्ये नवीन 37mm USD फ्रंट फोर्क सस्पेन्शनदेखील देण्यात आले आहेत. या नवीन Pulsar N250 मध्ये Pulsar NS200 प्रमाणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल, ज्यात टॅकोमीटर रीडिंग, मायलेज, स्पीड, इंधन पातळी, ओडोमीटर आणि ट्रिप मीटररीडिंग यासारखी महत्त्वाची माहिती पाहता येईल.
3 / 6
याव्यतिरिक्त Bajaj Pulsar N250 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीदेखील आहे, ज्यामुळे तुम्ही कॉल, एसएमएस अलर्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन वापरू शकता. बाईकच्या या अपडेटेड व्हर्जनमध्ये हँडलवरील स्विचगियरही बदलण्यात आला असून नवीन बटण देण्यात आले आहे.
4 / 6
मागील मॉडेलप्रमाणे, यात टँक माउंट यूएसबी चार्जिंग पोर्टदेखील आहे. इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात तीन ABS मोड, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि पूर्वीपेक्षा अधिक रुंद टायर मिळतील. समोर 110-सेक्शन आकाराचा टायर असेल, तर मागील बाजूस 140-सेक्शन आकाराचा टायर मिळेल.
5 / 6
नवीन Pulsar N250 मध्ये सीटच्या उंचीत थोडा बदल करण्यात आला आहे. या नवीन बाईखच्या सीटची उंची पूर्वीपेक्षा 5 मिमी जास्त झाली आहे. बाईकचे वजनही 2 किलोने वाढले आहे. पण, याचा व्हीलबेस 9 मिमीने कमी करुन 1342 मिमी केला आहे. बाईकमध्ये 165mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. बाईकमध्ये 14 लिटरचे पेट्रोल टँक देण्यात आले आहे.
6 / 6
कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक 45 kmpl चे मायलेज देईल. इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 2024 Bajaj Pulsar N250 मध्ये 249.07cc, सिंगल सिलिंडर, एअर/ऑइल कूल्ड इंजिन आहे, जे 24.5PS पॉवर आणि 21.5Nm टॉर्क जनरेट करते.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगauto expoऑटो एक्स्पो 2023