शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त मायलेज, उत्तम फीचर्स; ११९ टक्क्यांनी वाढली Hyundai च्या 'या' कारची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 1:13 PM

1 / 15
भारतीय बाजारात सब कॉम्पॅक्ट सेडान कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत, मारुती सुझुकीपासून ह्युंदाई आणि टाटा मोटर्स पर्यंत, दिग्गज प्लेयर्सनं या विभागात त्यांच्या सर्वोत्तम कार लाँच केल्या आहेत.
2 / 15
जरी मारुती सुझुकी डिझायर नेहमीच या विभागात पहिल्या क्रमांकावर राहिली असली तरी जुलै महिन्यात Hyundai Aura नं बाजारात झपाट्याने पकड घेतली आहे.
3 / 15
कंपनीद्वारे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात Maruti Dzire 10,470 युनिट्ससह पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर जुलै महिन्यात Hyundai Aura ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी दुसरी कार बनली आहे.
4 / 15
कंपनीने या कारच्या एकूण 4,034 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी जुलै महिन्यात 1,839 युनिट्सच्या तुलनेत 119.3 टक्क्यांनी अधिक आहे.
5 / 15
ह्युंदाई नेहमीच मारुती सुझुकीची सर्वात जवळची प्रतिस्पर्धी राहिली आहे. वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, ह्युंदाई आपल्या कारशी तडजोड करत नाही.
6 / 15
याशिवाय ह्युंदाईचे इंटीरियरही ग्राहकांच्या पसंतीस पडत असतं. एकूण 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये येणारी ऑरा सेडान दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन तसेच सीएनजी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
7 / 15
कंपीनं या कारच्या पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 1.2 लिटर क्षमतेच्या इंजिनचा वापर केला आहे. ते 81bhp ची पॉवर आणि 111Nm चा टॉर्क जनरेट करते.
8 / 15
तर दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये कंपनीनं 1.0 लिटर टर्बोचार्ज इंजिन दिलं आहे. ते 98bhp ची पॉवर आणि 172Nm चा टॉर्क जनरेट करते.
9 / 15
Hyundai Aura या कारच्या डिझेल व्हर्जनमध्ये 74bhp/190Nm च्या 1.2 लिटर इंजिन देण्यात आलं आहे.
10 / 15
इंटिरिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर याचं केबिन ब्राऊन आणि ब्लॅक कलरनं डिझाईन करण्यात आलं आहे. यामध्ये बऱ्यापैकी Nios हॅचबॅकचे कंपोनन्ट्स पाहायला मिळतात.
11 / 15
यामध्ये अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो आणि अनेक कनेक्टिव्हीटी पर्यायांसह ८ इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलं आहे.
12 / 15
टचस्क्रीन सिस्टम सेमी डिजिटल स्पीडोमीटरसह एका मोठ्या युनिटप्रमाणे देण्यात आलं आहे. याशिवाय तुम्हाला ड्रायव्हर सीटसाठी क्लायमेट कंट्रोलसोबतच हाईट अॅडजस्टमेंटही मिळते.
13 / 15
Hyundai Aura ची किंमत 6 लाख रूपयांपासून सुरू होते आणि 9.36 लाख रुपयांपर्यंत जाते. याच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 6 लाखांपासून 8.72 लाखांपर्यंत आहे.
14 / 15
तर कारच्या CNG व्हेरिअंटची किंमत 7.66 लाख आहे. डिझेल व्हर्जनची किंमत 7.91 लाखांपासून 9.36 लाखांच्या दरम्यान आहे. सामान्यत: या कारचं पेट्रोल व्हर्जन 20 किमी आणि डिझेल व्हर्जन 25 किमी प्रति लिटरचं मायलेज देतं.
15 / 15
Hyundai Aura चं सीएनजी व्हेरिअंट एक किलोग्राम सीएनजीमध्ये २८ किलोमीटरपर्यंतचं मायलेज देतं. दरम्यान, हे मायलेज ड्रायव्हिंगची पद्धत आणि रोड कंडिशनवर आधारित आहे.
टॅग्स :carकारHyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत