Hero Electric Launched its New Range of Electric Scooters: Optima CX5.0, Optima CX2.0 and NYX.
Hero ने लॉन्च केल्या तीन Electric Scooter, किंमत 85 हजार रुपयांपासून सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 6:08 PM1 / 6हिरो इलेक्ट्रिकने (Hero Electric) भारतीय बाजारपेठेत Optima CX 2.0, Optima 5.0 आणि NYX या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. 2 / 6कंपनीने डार्क मॅट ब्लू आणि मॅट मरूनमध्ये Optima 2.0, डार्क मॅट ब्लूमध्ये आणि चारकोल ब्लॅकमध्ये Optima 5.0, तर ब्लॅक आणि पर्ल व्हाइट कलर ऑप्शनमध्ये NYX लॉन्च केली आहे.3 / 6या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर जर्मन ECU टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहेत. Optima CX5.0 मध्ये 3 kWh C5 Li-ion बॅटरी आहे. याचा टॉप स्पीड 55kmph आणि ग्राउंड क्लीयरन्स 165mm आहे. ही स्कूटर फूल चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात.4 / 6Optima CX2.0 चा टॉप स्पीड 48 किमी/तास आहे आणि ग्राउंड क्लीयरन्स 165mm आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 4.5 तासात फुल चार्ज होऊ शकते.5 / 6NYX CX5.0 स्कूटरचा टॉप स्पीड 48 किमी/तास आणि ग्राउंड क्लीयरन्स 175mm आहे. यात 3 kWh C5 Li-ion बॅटरी आहे. स्कूटर 3 तासात फुल चार्ज होऊ शकते.6 / 6Optima CX 2.0, Optima 5.0 आणि NYX च्या किमती 85,000 रुपयांपासून सुरू होतात. हिरो इलेक्ट्रिक कम्फर्ट स्कूटरची किंमत 85,000 रुपये ते 95,000 रुपये आहे. तर सिटी स्पीड स्कूटरची किंमत 1.05 लाख ते 1.30 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications