Hero Electric Scooter take home for only Rs 5,000; Loan EMI Scheme
Hero Electric Scooter : केवळ ५००० रुपयांत घरी घेऊन जा हिरोची इलेक्ट्रीक स्कूटर; आणली भन्नाट स्कीम By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 3:41 PM1 / 6देशात इलेक्ट्रीक स्कूटरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जी येतेय ती कंपनी या क्षेत्रातील बादशाह बनण्याच्या प्रयत्नात आहे. कारण पेट्रोलमध्ये हिरो, होंडा, टीव्हीएस या बादशाह आहेत. परंतू इलेक्ट्रीक हे नवीन सेगमेंट असल्याने यामध्ये कंपन्या एका मागोमाग एक अशा उड्या घेत आहेत. यामुळे भविष्यासाठी बादशाह बनण्याची तयारी करत कंपन्या करत आहेत.2 / 6लोकही घाबरत घाबरत इलेक्ट्रीक स्कूटर घेत आहेत. यामुळे या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिरो कंपनीने जबरदस्त ऑफर आणली आहे. या कंपनीने गेल्या वर्षी ५०००० हून अधिक इलेक्ट्रीक स्कूटर विकल्या आहेत. कंपनीने ही विक्री वाढविण्यासाठी फक्त ५००० रुपये डाऊनपेमेंटची स्कीम आणली आहे. 3 / 6हिरोने एट्रिया एलएक्स (Hero Electric Atria LX) आणि हीरो इलेक्ट्रिक फ्लैश एक्स ( Hero Electric Flash LX) वर ही स्कीम आणली आहे. तुम्ही ५००० रुपये देवून या स्कूटर घरी नेऊ शकता. ही मुदत २ वर्षांची आहे. Hero Electric Atria LX ची एक्सशोरुम किंमत 66,640 रुपये आहे. या स्कूटरच्या बॅटरीची रेंज 85 km आहे, तर टॉप स्पीड 25 kmph आहे. 4 / 6इलेक्ट्रिक फ्लैश एलएक्स ( Hero Electric Flash LX) ची किंमत 59,640 रुपये आहे. या स्कूटरच्या बॅटरीची रेंज सिंगल चार्जवर 85 km देते. टॉप स्पीड 25 kmph पर्यंत आहे. आता आपण या स्कूटरच्या लोन बाबत माहिती घेऊया.5 / 6हिरो इलेक्ट्रीकच्या एट्रिया एलएक्स मॉडेलवर कर्ज घ्यायचे ठरविले तर तुम्ही ५००० रुपयांचे डाऊनपेमेंट करून इलेक्ट्रीक स्कूटर घरी नेऊ शकता. डाऊनपेमेंटनंतर तुम्ही २ वर्षांसाठी 8 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. 61,640 रुपयांचे कर्ज मिळेल. यासाठी तुम्हाला २४ महिन्यांसाठी 2,788 रुपये ईएमआय भरावा लागेल. 6 / 6तर Hero Electric Flash LX साठी 5000 रुपये डाउनपेमेंट भरल्यास 54,640 रुपयांचे कर्ज मिळेल. याचा कालावधी २ वर्षे असेल. व्याज दर ८ टक्के पकडला तर दोन वर्षांसाठी तुम्हाला 2,471 रुपये ईएमआई द्यावा लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications