शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hero ची बहुप्रतिक्षीत Karizma XMR 210 लॉन्च, किंमत 2 लाखांपेक्षा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 3:11 PM

1 / 6
Hero Karizma XMR 210 Launch: देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Hero MotoCorp ने आपली सर्वात शक्तिशाली, आयकॉनिक आणि लोकप्रिय बाईक Karizma XMR 210 नवीन अवतारात लॉन्च केली आहे. तरुणांमध्ये या बाईकची क्रेझ पाहता, प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कंपनीने ही बाईक भारतीय बाजारात रिलॉन्च केली आहे.
2 / 6
मागणीच्या अभावामुळे कंपनीने 2019 मध्ये या बाईकचे प्रोडक्शन बंद केले होते, पण आता 2023 मध्ये ही बाईक नवीन लुक, नवीन स्टाइल आणि नवीन फीचर्ससह रिलॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा लॉन्च केली होती. आता या अपडेटेड Karizma बाईकमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
3 / 6
कंपनीने लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सांगितले की, या बाईकमध्ये 210 cc लिक्विड कूल्ड DOHC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7250 rpm वर जास्तीत जास्त 20.4 Nm टॉर्क आणि 9250 rpm वर 25.5 PS पॉवर जनरेट करेल. कंपनीने बाइकमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन(गिअर) दिले आहेत. याशिवाय बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचदेखील आहे.
4 / 6
महत्त्वाची बाब म्हणजे या बाइकमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन फीचर देण्यात आले आहे. याशिवाय अॅडजस्टेबल विंडशील्डही मिळेल. याशिवाय बाइकमध्ये क्लास-डी एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळतील.
5 / 6
कंपनीने या बाईकची किंमत 1,72,900 लाख रुपये निश्चित केली आहे. ही बाइकची सुरुवातीची किंमत आहे. कंपनी आजपासून या बाईकसाठी बुकिंग विंडो उघडणार आहे. कंपनीने ही बाईक 3 कलर व्हेरियंटसह लॉन्च केली आहे. यात काळा, लाल आणि पिवळा रंग मिळेल.
6 / 6
कंपनीने 20 वर्षांपूर्वी ही गाडी लॉन्च केली होती. तेव्हापासून अगदी आतापर्यंत या गाडीची खूप क्रेझ होती. विशेषतः तरुणांमध्ये या गाडीची प्रचंड क्रेझ होती आणि आजही आहे. त्यामुळेच कंपनीने या गाडीचे नवीन अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. आता या गाडीला किती पसंती मिळते, हे येणाऱ्या काळात कळेल.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पAutomobileवाहनbikeबाईक