शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hero MotoCorp : 25 हजारांनी कमी झाल्या Hero इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती; फक्त 499 मध्ये करा बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 1:48 PM

1 / 6
Hero MotoCorp ने गेल्या वर्षी आपल्या Vida ब्रँड अंतर्गत Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉनच केल्या होत्या. या स्कूटर्स पहिल्यांदा बाजारात आणल्या तेव्हा त्यांची किंमत अनुक्रमे 1.45 लाख आणि 1.59 लाख रुपये ठेवण्यात आली होती. पण आता कंपनीने या दोन्ही स्कूटरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे तुम्हीही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते.
2 / 6
कंपनीने दोन्ही स्कूटरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. Vida V1 Plus ची किंमत 25,000 रुपयांपर्यंत कमी झाली आहे, तर V1 Pro ची किंमत 19,000 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. किमतीत कपात केल्यानंतर, Vida V1 Plus ची किंमत 1.20 लाख रुपये आणि V1 Pro ची किंमत 1.40 लाख रुपये आहे. इच्छुक ग्राहक या स्कूटर फक्त रु.499 मध्ये बुक करू शकतात.
3 / 6
V1 Plus मध्ये, कंपनीने 3.44 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो प्रत्येकी 1.72 kWh च्या दोन बॅटरी सेटसह येतो. या दोन्ही रिमुव्हेबल बॅटरी आहेत. कंपनीचा दावा आहे की, याची IDC रेंज 143 किमी आहे आणि वास्तविक जगात ही स्कूटर एका चार्जवर 85 किमी पर्यंत प्रवास करू शकते. या 124 किलोग्रॅमच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने तीन रायडिंग मोड दिले आहेत, ज्यात इको, राइड आणि स्पोर्ट मोड आहे. दोन्ही स्कूटरच्या पॉवर आणि परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर त्याचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 6 kW ची पीक पॉवर आणि 25 Nm टॉर्क जनरेट करते.
4 / 6
V1 Pro मध्ये कंपनीने 3.94 kWh क्षमतेचा (2x1.97 kWh) बॅटरी पॅक दिला आहे. याची IDC श्रेणी 165 किमी आहे आणि वास्तविक जगात ही स्कूटर 95 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की, Pro Modz केवळ 3.2 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. त्याचा टॉप स्पीड सुद्धा 80 किमी प्रतितास आहे.
5 / 6
दोन्ही स्कूटर्सबाबत कंपनीचा दावा आहे की, त्यांची बॅटरी एका फास्ट चार्जरने केवळ 65 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होते, तर बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास 15 मिनिटे लागतात. या स्कूटरमध्ये 7-इंचाचा TFT टच डिस्प्ले आहे, जो डार्क आणि ऑटो मोडसह येतो. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत, त्याशिवाय ब्रेकिंगसाठी समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.
6 / 6
इतर वैशिष्ट्यांमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अँटी थेफ्ट अलार्म, ट्रॅक माय बाईक, जिओफेन्स, रिमोट इमोबिलायझेशन, व्हेईकल डायग्नोस्टिक, एसओएस अलर्ट बटण, फॉलो मी होम लाइट्स, कीलेस एंट्री, इलेक्ट्रॉनिक सीट आणि हँडल लॉक, क्रूझ कंट्रोल, थ्रॉटल सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. आणि इनकमिंग कॉल अलर्टही उपलब्ध आहे.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन