Hero MotoCorp to hike prices bikes scooters again by up to INR 3000
मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 6:41 PM1 / 6देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने पुन्हा एकदा आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चाचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढील आठवड्यापासून सर्व मॉडेल्सच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनी 20 सप्टेंबर 2021 पासून नवीन किंमती लागू करणार आहे.2 / 62021 मध्ये ही तिसरी वेळ आहे जेव्हा कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने यापूर्वी आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किंमती जानेवारीमध्ये 1,500 रुपयांपर्यंत आणि पुन्हा एप्रिलमध्ये 2,500 रुपयांनी वाढवल्या होत्या.3 / 6 उत्पादनाच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. कोणत्या बाईकसाठी किंमत वाढेल हे त्या बाईकच्या मॉडेलवर अवलंबून असेल. दरम्यान, कोरोनाच्या काळात विक्रीवर परिणाम झाला होता. त्यामुळे वाढत्या किंमतींमुळेही त्यावर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 4 / 6हिरो मोटोकॉर्प देशांतर्गत बाजारात विविध प्रकारच्या बाईक आणि स्कूटर्सची विक्री करते. देशांतर्गत बाजारात गेल्या महिन्यात कंपनीचे घाऊक विक्री 4,31,137 युनिट इतकी होती. जी मागील वर्षी याच महिन्यात 5,68,674 युनिट्स इतकी होती.5 / 6स्टील आणि अन्य धातूंच्या विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गेल्या एका वर्षात वाढल्या आहेत. यामुळे वाहन उत्पादकांचा खर्चही वाढला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीच्या दरम्यान ही दरवाढ ग्राहकांसाठी चांगली नसल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे. याच कारणामुळे मोठ्या संख्येने लोक इलेक्ट्रीक दुचाकीकडे वळत आहेत.6 / 6ओला ने अलीकडेच घरगुती बाजारात आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली, ज्याच्या बुकिंगची रक्कम 499 रुपये ठेवण्यात आली होती. कंपनीने बुधवारी या स्कूटरची अधिकृत विक्री सुरू करण्यात आल्याचं सांगितलं. दरम्यान सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळेही अनेक जण इलेक्ट्रीक बाईक्सकडे वळताना दिसत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications