शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hero ची भन्नाट ऑफर! केवळ १० हजार भरा अन् घरी न्या ‘ही’ दमदार बाइक; ६५ किमीचे मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 3:49 PM

1 / 9
आताच्या घडीला देसी कंपन्या कमाल कामगिरी करत आहेत. देशातील कोट्यवधी ग्राहक बाइकचे दिवाने आहेत. त्यात जास्त मायलेज असेल, तर अल्पावधीतच ती बाइक लोकप्रिय होते. Hero मोटोकॉर्प देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे.
2 / 9
Hero मोटोकॉर्प ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि बेस्ट बाइक आणल्या आहेत. ज्या मायलेज मध्ये जबरदस्त आहेत. हिरो एचएफ डीलक्स अशी एक बाइक आहे. जी तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल्फ सोबत अलॉय आणि ड्रम अलॉयसारख्या ऑप्शनमध्ये मिळते.
3 / 9
Hero एचएफ डीलक्सची किंमत आणि खास वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास एचएफ डिलक्स किक स्टार्ट ड्रम अलॉय व्हील व्हेरियंटची ऑन रोड किंमत ६३ हजार ६९९ रुपये, एचएफ डीलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील व्हेरियंटची ऑन रोड किंमत ७४ हजार ६७७ रुपये आहे.
4 / 9
Hero एचएफ डीलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील ऑल ब्लॅक व्हेरियंटची किंमत ७४ हजार ८२२ रुपये आणि एचएफ डीलक्स सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील आय३एक्स व्हेरियंटची किंमत ७६ हजार १३८ रुपये आहे.
5 / 9
Hero च्या या बाइकमध्ये ९७.२ सीसीचे इंजिन दिले आहे. हे ४ स्पीड गियरबॉक्स दिले आहे. या स्वस्त बाइकचे मायलेज ६५ किमी प्रति लीटर पर्यंत आहे. हिरो एचएफ डीलक्स बाइकचे किक स्टार्ट ड्रम अलॉय व्हील व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर ७ हजार रुपये डाउनपेमेंट करून ९.७ टक्के व्याज दराच्या हिशोबाने ५६ हजार ६९९ रुपये लोन मिळेल.
6 / 9
यानंतर ३ वर्षासाठी दर महिना २ हजार १४२ रुपये ईएमआय द्यावा लागेल. Hero एचएफ डीलक्सचे सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील अलॉय व्हील ऑल ब्लॅक व्हेरियंट फायनान्स करीत असाल तर तुम्हाला ८ हजार रुपये डाउन पेमेंट करून ९.७ टक्के व्याज दर या हिशोबाप्रमाणे ६६ हजार ८२२ रुपये लोन मिळेल.
7 / 9
तसेच ३ वर्षासाठी दर महिना २ हजार १४७ रुपये ईएमआय द्यावा लागेल. Hero एचएफ डीलक्सचे टॉप व्हेरियंट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील आय३एक्स व्हेरियंट खरेदी करीत असाल तर ८ हजार रुपये डाउन पेमेंट करून ९.७ टक्के व्याज दराने ६८ हजार १३८ रुपये लोन मिळेल.
8 / 9
३ वर्षापर्यंत तुम्हाला दर महिना २ हजार १८९ रुपये ईएमआय द्यावा लागेल. सदर आकडे ईएमआयच्या कॅलक्यूलेटरच्या आधारावर आहे. मात्र, Hero एचएफ डीलक्स बाइक फायनान्स करायचे असेल तर एकदा जवळच्या हिरो मोटोकॉर्प डीलरशीपला भेट द्यावी लागेल आणि सर्व डिटेल्स पाहावे लागतील.
9 / 9
दरम्यान, अलीकडेच हिरो कंपनीचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. तर दुसरीकडे कंपनीचे शेअर्सही गडगडले.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्प