शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hero MotoCorp एकाच वेळी तीन नवीन ढासू बाईक लाँच करणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:54 PM

1 / 9
भारताची दुचाकी निर्मिती करणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पने 1 मे रोजी दोन थरारक अनुभव देणाऱ्या बाईक लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. Xpulse मोटारसायकलच्या दोन नवीन मॉडेल्स असणार आहेत. या बाईक ऑफरोड आणि दुसरी साध्या रस्त्यांवर घेण्यासाठी बनविण्यात आली आहे.
2 / 9
Hero Xpulse 200 आणि Hero Xpulse 200T असे या बाईकचे नाव आहे. दोन्ही बाईक स्टर्डी बनविण्यात आल्या आहेत. या बाईकच्या लाँचिंगसाठी कंपनीने 29 आणि 30 एप्रिल रोजी बेंगळुरुमध्ये चित्तथरारक राईडचा इव्हेंट आयोजित केला आहे.
3 / 9
या दोन खतरनाक बाईकचा लूक ऑफरोड रेसिंगच्या बाईकसारखाच ठेवण्यात आला आहे. बसण्याची सीट उंच, पुढील हँडलही उंच आणि हेडलँप गोलाकार ठेवण्यात आले आहेत. Xpulse 200 मध्ये लांबलचक पुढील मडफ्लॅप आणि स्टड असलेले टायर असणार आहेत. तर अश्रु ओघळतानासारखी इंधनाची टाकी असणार आहे. बाईकमध्ये खडबडीतपणा आणण्यासाठी हँडलवरील नॅक गार्ड आणि लिव्हरवरील सेफगार्ड नव्या रुपात देण्यात आला आहे. तसेच ऑईल संपला सुरक्षा देणारी प्लेटचा आकारही बदलण्यात आला आहे.
4 / 9
दोन्ही मोटारसायकल या 200 सीसी इंजिनाने युक्त असणार आहेत. हे इंजिन 18.4 बीएचपी ताकद आणि 17.1 एनएमचा टॉर्क देणार आहेत. या बाईकमध्ये कार्बोरेटरऐवजी इन्जेक्टर वापरण्यात येणार आहेत.
5 / 9
दोन्ही चाकांची साईज वेगवेगळी आहे. पुढील चाक 21 आणि मागील चाक 18 इंचाचे देण्यात आले आहे. तसेच एबीएसही देण्यात आले आहे.
6 / 9
या दोन्ही बाईकची किंमत 1 ते 1.15 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
7 / 9
ऑईल संपला सुरक्षा देणारी प्लेटचा आकारही बदलण्यात आला आहे.
8 / 9
मागील चाकाला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. ऑफरोड चालविण्यासाठी बाईकला 220 एमएमचा ग्राऊंड क्लिअरंस देण्यात आला आहे.
9 / 9
मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक बाईक लाँच केली जाणार आहे, तिचे नाव करिझ्मा आहे. होय करिझ्मा नव्या रुपात येत आहे.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकmotercycleमोटारसायकल