शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सणासुदीपूर्वी Hero चा ग्राहकांना झटका, बाईक्सच्या किंमती महागल्या; पाहा किती झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 9:44 AM

1 / 6
Hero MotoCorp Bikes Price Hike : सणासुदीच्या काळात बाइक्स घेण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे. Hero MotoCorp या भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या बाईकच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
2 / 6
यापूर्वी 2022 मध्ये कंपनीने आपल्या बाइक्सच्या किंमतीत दोन वेळा वाढ केली होती. बाइक्सच्या उत्पादनावरील वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ करण्यात आली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. दसरा दिवाळी अशा सणासुदीच्या कालावधीत अनेक जण बाईक्स खरेदी करत असतात. अशा लोकांना आता आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे.
3 / 6
Hero MotoCorp ने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती वाढवल्या आहेत. बाईकच्या कमाल किंमतीत 1000 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ निरनिराळी मार्केट आणि बाईक्सच्या मॉडेलनुसार निराळी आहे. नवीन किमती तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. महागाईचा वाढता परिणाम कमी करण्यासाठी किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली.
4 / 6
तर दुसरीकडे Hero Motocorp इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. ग्राहकांसाठी कंपनी आपली पहिली ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रीक स्कूटर पुढील महिन्यात लॉन्च करणार आहे. कंपनी पुढील महिन्यात 7 ऑक्टोबर रोजी ही स्कूटर लाँच करणार आहे, सध्या या स्कूटरशी संबंधित जास्त माहिती समोर आलेली नाही. परंतु 10 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने या स्कूटरची एक झलक दाखवली आहे.
5 / 6
Hero Motorcorp ने काही काळापूर्वी आपला Vida सबब्रँड ट्रेडमार्क केला होता आणि या ब्रँडचे संपूर्ण लक्ष इलेक्ट्रीक सेगमेंटवर असेल. काही काळापूर्वी, कंपनीने विदा ईव्ही, विदा मोटोकॉर्प, विदा इलेक्ट्रीक, विदा मोटरसायकल्स आणि विदा स्कूटर्ससाठी पेटंट फाईल केलं होतं.
6 / 6
आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, या Hero इलेक्ट्रीक स्कूटरच्या पुढील भागात 12-इंच अलॉय व्हील आणि मागील बाजूस 10-इंच अलॉय व्हिल्स असतील. ही स्कूटर फुल चार्जमध्ये किती रेंज देईल, लवकरच कंपनी याबाबत माहिती देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्कूटरची किंमत 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकIndiaभारत