शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डिजिटल युगातील सर्व काही आहे या हिरोच्या नव्या Xtreme 200S मध्ये...पहा फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 1:01 PM

1 / 9
भारतीय कंपनी हिरोने जपानच्या होंडासोबतचा करार संपल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील बाईकला नवीन ढंगात आणण्याचा सपाटाच लावला आहे. हिरोने बुधवारी एकाच दिवशी तीन बाईक लाँच केल्या. यामध्ये XPusle 200, XPulse 200T आणि जुन्या एक्सट्रीमचे नवे मॉडेल लाँच केले आहे. या बाईकला नवे रुपडे दिलेले असले तरीही ते यामहा आणि केटीएमच्या बाईकपेक्षा भारदस्त नाहीय.
2 / 9
नव्या Hero Xtreme 200S ला गेल्यावर्षी लाँच केलेल्या Xtreme 200R च्या धर्तीवर बनविण्यात आले आहे. यामुळे अनेक पार्ट सारखेच आहेत. ब्लॅक अलॉय व्हील्स, सिंगल पीस सीट, किक स्टार्ट लिवर, टेल सेक्शन आणि साईड पॅनल डिझाईनसोबत येते.
3 / 9
. Xtreme 200S ला पुढील बाजुला फेअरिंग नवीनच देण्यात आले आहे. शिवाय काळ्या रंगामध्ये छोटा हेडलँप दिला आहे.
4 / 9
बाईकमध्ये फुल एलईडी हेडलँप, टेललँप आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हीटी असलेला डिजिटल एलईडी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हीगेशन, गियर पोझिशन इंडीकेटर, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमाईंडर अलर्ट देण्यात आला आहे.
5 / 9
या बाईकमध्ये 200 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे 8 हजार आरपीएमवर 18 बीएचपी ताकद आणि 6500 आरपीएमवर 17.1 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने युक्त आहे.
6 / 9
Hero Xtreme 200S मध्ये टेलिस्कोपीक फ्रंट फोर्क्स आणि पाठीमागे एक 7 स्टेप अॅड्जेस्टेबल मोनोशॉक सप्सेंशन देण्यात आले आहे
7 / 9
ब्रेकिंगमध्ये 276 मीमी डिस्कसह सिंगल चॅनल एबीएस आणि पाठीमागे 220 एमएम डिस्क देण्यात आली आहे. सीट हाईट 795 एमएम आणि ग्राऊंड क्लिअरंस 165 मिमी आहे. वजन 149 किलो आहे.
8 / 9
ब्रेकिंगमध्ये 276 मीमी डिस्कसह सिंगल चॅनल एबीएस आणि पाठीमागे 220 एमएम डिस्क देण्यात आली आहे. सीट हाईट 795 एमएम आणि ग्राऊंड क्लिअरंस 165 मिमी आहे. वजन 149 किलो आहे.
9 / 9
स्पोर्टी लूकसाठी बाईकला स्पोर्ट्स रेड, मॅपल ब्राऊन आणि पँथर ब्लॅक अशा रंगांमध्ये आणण्यात आले आहे. मे च्या शेवटी ही बाईक मिळणार आहे.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पmotercycleमोटारसायकल