शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata नं रचला इतिहास...! अशा गाडीचा ना कुणी विचार केला, ना कुणी बनवली; किंमत केवळ 7.5 लाखपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 5:56 PM

1 / 8
भारतात सुरक्षिततेचे दुसरे नाव म्हणून टाटा मोटर्सच्या कारची ओळख आहे. टाटा मोटर्स खरो खरच सुरक्षित कार बनवते. टाटाने नुकतीच एक अशी कार बाजारात आणली आहे, जी सर्व कंपन्यांच्या कल्पनेपलीकडची आहे.
2 / 8
खरे तर, देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही आजवर अशा प्रकारची कार डिझाइन केलेली नाही. आम्ही ज्या कारसंदर्भात बोलत आहोत ती कार आहे Tata Altroz ​​iCNG. या कारमध्ये CNG सिलेंडर असूनही भरपूर जागा देते.
3 / 8
Altroz ​​ही कंपनीची एक प्रीमियम हॅचबॅक आहे, जी 5-स्टार सेफ्टी आणि विविध प्रकारच्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह येते. ही कार सध्या सीएनजी मॉडेलमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. या कारमध्ये सीएनजी असूनही स्पेस आणि कम्फर्टशी कसल्याही प्रकारची तडजोड करण्यात आलेली नाही. यामुळेच Altroz iCNG ला तिच्या सेगमेंटमधील सर्वात बेस्ट डिझाइन सीएनजी कार म्हटले जात आहे. जाणून घेऊया या कारच्या फीचर्ससंदर्भात...
4 / 8
जबरदस्त बूट स्पेस - Altroz ​च्या पेट्रोल मॉडेलमध्ये 345 लीटरचा बूट स्पेस मिळतो. तर सीएनजी मॉडेलमध्ये 30-30 लिटरचे दोन सिलिंडर ठेवूनही 210 लिटरचा बूट स्पेस मिळतो. कंपनीने या कारमध्ये ट्विन सिलिंडर तंत्रज्ञान वापरले आहे. या कारच्या बूट एरियाखाली दोन सिलिंडर सेट करण्यात आले आहेत. कारचा स्टेपनी टायर मागील बंपरखाली ठेवण्यात आला आहे. याच बरोबर, सीएनजी टँकला रिअर कोलिजन डॅमेज होण्यापासून वाचविण्यासाठी बूट स्पेसला अतिरिक्त सुरक्षा देखील देण्यात आली आहे.
5 / 8
Tata Altroz iCNG ला एकूण 6 व्हेरिअंट – XE, XM+, XM+(S), XZ, XZ+(S) आणि XZ+O(S) मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या कारची दिल्ली एक्स-शोरूम कीमत 7.55 लाख रुपयांपासून सुरू होऊन 10.54 रुपयांपर्यंत जाते.
6 / 8
कमाल फीचर्स! - फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 7-इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 4 स्पीकर, किलेस एन्ट्री, इलेक्ट्रिक पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल, अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, रियर ऐसी व्हेंट्स, टीपीएमएस, वायरलेस चार्जर, नेव्हिगेशन आणि व्हँइस अस्सिटन्स फीचर असलेले सनरूफही मिळते. यह देश की पहली प्रीमियम हॅचबॅक आहे. जिला सीएनजीसह सनरूफ दिले जाते.
7 / 8
इंजिन आणि गिअरबॉक्स - Tata Altroz iCNG ला पेट्रोल मॉडेलचे 1.2-लीटर रेव्होट्रॉन इंजिनने पॉवर मिळते. पेट्रोल मॉडेमध्ये हे इंजिन 88hp पॉवरसह 115Nm टॉर्क जनरेट करते. तर CNG मॉडेलमध्ये 73.5 bhp पॉवर आणि 103 Nm टॉर्क जनरेट करते.
8 / 8
अल्ट्रोज सीएनजीच्या सर्व व्हेरिअंट्समध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यात ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्धनाही. सीएनजी मोडमध्ये टाटा अल्ट्रोज 19.33 km/kg एवढे एआरएआय सर्टिफाईड मायलेज देते.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार