शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अजून केवळ पाच महिने, बंद होणार Honda च्या ३ जबरदस्त कार्स; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:35 PM

1 / 8
होंडा कंपनी चारचाकी वाहनांसाठी नावाजलेली कंपनी आहे. पण, पुढच्या पाच महिन्यात होंडा कंपनी आपल्या लोकप्रिय डिझेल कार बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. होंडा कंपनी होंडा सीटी आणि अॅमेज हे दोन मॉडेल बंद करणार आहे.
2 / 8
1 एप्रिल 2023 पासून लागू होणारे रिअल टाइम ड्रायव्हिंग एमिशन या नियमामुळे या कार बंद करणार आहे. या तिन्ही कार डिझेल व्हेरिएंट आरडीई नियमामध्ये बसत नाहीत. RDE नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीला आपल्या इंजिनमध्ये बरेच बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे कंपनी या तीन कारचे डिझेल व्हेरियंट बंद करु शकते.
3 / 8
पेट्रोल इंजिन असलेल्या कारपेक्षा डिझेल इंजिन असलेल्या कार आधीच महाग आहेत. सध्याचे डिझेल इंजिन RDE नियमात येण्यासाठी या इंजिनमध्ये बरेच बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे कंपनीच्या खर्चात मोठी वाढ होऊ शकते. किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम डिझेल कारच्या किमतीवर होणार आहे.
4 / 8
त्यामुळे डिझेल कार महाग होतील, त्यामुळे कंपनी त्यांना लाइनअपमधून काढून टाकेल. एका अहवालानुसार, होंडा फेब्रुवारी 2023 पासून होंडा सिटी, अमेझ आणि WR-V च्या डिझेल प्रकारांचे उत्पादन थांबवू शकते.
5 / 8
यामुळे होंडा आपल्या डिझेल इंजिनचे उत्पादन थांबवू शकते. फक्त 1.5 लीटर टर्बा इंडिनच बंद होऊ शकते असं नाही. 1.5 लीटर i-DTEC डीझेल इंजिनही बंद करु शकते. कंपनी या इंजिनचा वापर Honda CR-V ला थायलंडच्या बाजारात एक्सपोर्ट करु शकते. त्यामुळे भारतीय रस्त्यांवर होंड्याच्या डिझेलवर चालणाऱ्या कार दिसणार नाही.
6 / 8
Honda कंपनी 2023 मध्ये नवीन Honda SUV बाजारात आणू शकते. आगामी SUV कार मजबूत पेट्रोल हायब्रीड तंत्रज्ञानासह लॉन्च केली जाऊ शकते. होंडाने याआधीच होंडा सिटीच्या हायब्रीड मॉडेलसह भारतीय हायब्रीड कार बाजारात आणली आहे.
7 / 8
भारतीय बाजारात डिझेल इंडिन बंद करणारी होंडा ही एकमेव कंपनी नाही. या अगोदर मारुती सुझुकीनेही आपल्या डिजेल कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
8 / 8
मारुती आता सीएनजी, पेट्रोल माइल्ड हायब्रिड आणि पेट्रोल स्ट्राँग हायइब्रिड कारवर जास्त फोकस करत आहे. यासह फॉक्सवॅगन आणि स्कोडानेही डिझेल कार बंद केल्या आहेत. दरम्यान, बाजारात महिंद्रा, टाटा मोटर्स, हुंदाई, किया यां कंपन्यांच्या डिझेल कार अजुनही आहेत.
टॅग्स :Honda Amazeहोंडा अमेझHondaहोंडा