Honda closed 23-year-old plant in Noida; Honda City, Civic production stopped
Honda ने २३ वर्षे जुना प्लांट बंद केला; Honda City, Civic पासून कार बनायच्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 4:32 PM1 / 10जपानची ऑटो कंपनी होंडा मोटर्सने ग्रेटर नोएडामध्ये प्रॉडक्शन युनिटच बंद केले आहे. बातम्यांनुसार वाढती प्रतिस्पर्धा आणि व्यवसायात आव्हानात्मक वातावरणामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप होंडा कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 2 / 10ग्रेटर नोएडाच्या या प्लांटमध्ये वर्षाला १ लाख कार बनत होत्या. या प्लँटमध्ये होंडा सिटी, सिव्हीक आणि सीआरव्ही सारख्या कार बनविण्यात येत होत्या. 3 / 10भारतात या कारचा चांगला खप असूनही कंपनीने हा प्लांट बंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरापासून काँम्पिटीशन वाढल्याने मागणी कमी झाली आहे. 4 / 10ग्रेटर नोएडातील या प्लँटची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली होती. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. होंडाचा हा प्लँट १५० एकर जागेवर पसरलेला आहे. 5 / 10डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच या प्लँटमध्ये उत्पादन बंद करण्यात आले आहे. यामुळे मागणी असलेल्या कारचे उत्पादन कंपीनीने राजस्थानच्या अलवरमधील तपुकारा प्लँटमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 6 / 10आता ग्रेटर नोएडाच्या प्लँटमधील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी काढून टाकले की त्यांना काही महिन्यांची सक्तीची रजा दिली आहे, याबाबत काहीच कंपनीने खुलासा केलेला नाही. 7 / 10येथील काही कर्मचाऱ्यांना तपुकारा प्लँटमध्ये हलविण्यात आले आहे. या प्लँटमध्ये आता १००० कर्मचारी उरले होते. त्यांच्यापैकी अनेकांनी सेवानिवृत्ती योजना स्वीकारल्याचे समजत आहे. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे. 8 / 10राजस्थानच्या तपुकारा प्लँटमध्ये वर्षाला १ लाख ८० हजार कार उत्पादित केल्या जातात. नोएडातील प्लँटमध्ये १९९७मध्ये वर्षाला ३०००० कार बनविल्या जात होत्या. 9 / 10असे असले तरीही नोएडातील कंपनीचे कार्पोरेट कार्यालय आणि आर अँड डी विभाग सुरुच राहणार आहे. कंपनी बंद झाल्याचा फटका आसपासच्या छोट्या छोट्या व्हेंडरनाही बसणार आहे.10 / 10 होंडाच्या प्लँटवर शेकडो कंपन्य़ा सुटे भाग पुरवठादार होत्या. प्लँट बंद झाल्याने या छोट्या कंपन्यांच्या कामगारांवरही नोकरीची टांगती तलवार असणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications