Honda Motorcycle | New honda 2022 CBR650R launched in India, know price and all features
Honda CBR650R 2022: Honda ने भारतात लॉन्च केली नवीन CBR650R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 4:55 PM1 / 7 मिडलवेट स्पोर्ट्स बाइक कॅटेगरीमध्ये भारतीय रायडिंग कम्युनिटीचा जोश वाढवण्यासाठी Honda Motorcycle & Scooter India (होंडा मोटरसाइकल अँड स्कूटर इंडिया) ने नवीन 2022 CBR650R (2022 सीबीआर650आर) बाईक लॉन्च केली आहे. 2 / 7 होंडाच्या या नवीन बाईकचे सीकेडी (कम्पलीटली नॉक्ड डाउन) यूनिट म्हणून भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. या बाईकला होंडाच्या एक्सक्लूसिव्ह बिगविंग टॉपलाइन शोरुममधून बूक करता येईल.3 / 7 कंपनीचा दावा आहे की, जबरदस्त परफॉर्मेंस आणि लूक्स असलेली ही नवीन 2022 CBR650R आपल्या क्लासिक फास्ट ‘पिक-अप’सह हार्ड हिटिंग टॉप अँड रेंजमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय होईल.4 / 7 आरामदायक राईड आणि उत्कृष्ट लूकसह या नवीन CBR650R बाईक मॅट गनपाउडर म्हणजेच ब्लॅक मेटॅलिक कलर आणि नवीन स्पोर्टी ग्राफिक्स म्हणजेच ग्रांड प्रिक्स रेड कलरमध्ये उपलब्ध आहे.5 / 7 या बाईकमध्ये नवीन अप्पर आणि लोवर फेअरिंग्स, मस्कुलेरिटीसोबत स्लिम बॉडी देण्यात आली आहे. तसेच, यात सीट युनिट रिअर एंडला कॉम्पॅक्ट आणि लहान लूक देण्यात आला आहे.6 / 7 या बाईकमध्ये 649cc, DOHC 16-व्हॉल्व इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12,000 rpm वर 64 kw ची पॉवर आणि 8,500 rpm वर 57.5 Nm टॉर्क जेनरेट करते.7 / 7 ही नवीन 2022 CBR650R बाईकची गुरुग्राममध्ये एक्स-शोरुम किंमत 9,35,427 रुपये ठेवण्यात आली आहे. होंडाने आपले एक्सक्लूसिव्ह प्रीमियम डीलरशिप्स- गुरुग्राम (हरियाणा), मुंबई (महाराष्ट्र), बँगळुरू (कर्नाटक), इंदुर (मध्य प्रदेश), कोची (केरळ), हैदराबाद (तेलंगाणा) आणि चेन्नई (तमिलनाडु) मध्ये बिगविंग टॉपलाइनवर उपलब्ध आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications