शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Honda कारवर मिळतोय शानदार डिस्काउंट, ग्राहक आकर्षित होतील अशा ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 12:34 PM

1 / 7
नवी दिल्ली : होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) मार्च महिन्यात आपल्या कारवर जोरदार ऑफर दिल्या आहेत. या जपानी ऑटोमेकरने आपल्या सर्व कारवर या ऑफर दिल्या आहेत, ज्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत उपलब्ध असणार आहेत.
2 / 7
या सर्व सवलती होंडा अमेझ (Honda Amaze), होंडा सिटी (Honda City), होंडा डब्ल्यूआरव्ही (Honda WR-V) आणि होंडा जॅझच्या (Honda Jazz) पाचव्या आणि चौथ्या जनरेशनवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. होंडा कार्स इंडियाने या सर्व कारवर एकूण 35,596 रुपयांपर्यंत ऑफर दिल्या आहेत, ज्या मॉडेल आणि व्हेरिएंटवर अवलंबून आहेत.
3 / 7
कंपनीने या सेडानवर 35,596 रुपयांची कमाल सूट दिली आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, कार एक्सचेंजवर 5,000 रुपयांचे बेनिफिट्स, जुन्या होंडा ग्राहकांसाठी 5,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, 7,000 रुपयांपर्यंतचा होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.
4 / 7
चौथ्या जनरेशनच्या होंडा सिटीवर एकूण 20,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. कंपनीने जुन्या होंडा ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, 7,000 पर्यंत होंडा कार एक्सचेंज ऑफर आणि 8,000 पर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला आहे.
5 / 7
होंडाने या प्रीमियम हॅचबॅकवर ग्राहकांना एकूण 33,158 रुपयांपर्यंतचा लाभ दिला आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 12,158 रुपयांपर्यंतच्या FOC अॅक्सेसरीज, एक्सचेंज बोनससाठी 5,000 रुपये, जुन्या होंडा ग्राहकांसाठी 5,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, होंडा कार एक्सचेंजवर 7,000 रुपये आणि 4,000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट समावेश आहे.
6 / 7
कंपनीने आपल्या सब कॉम्पॅक्ट SUV Honda WR-V वर एकूण 26,000 पर्यंत ऑफर दिल्या आहेत, ज्या सर्व पेट्रोल व्हेरिएंटवर दिल्या जात आहेत. यामध्ये कार एक्सचेंजवर 10,000 रुपयांपर्यंतचा बोनस, जुन्या ग्राहकांसाठी 5,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, होंडा कार एक्सचेंगवर 7,000 रुपयांपर्यंतचे फायदे आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे.
7 / 7
होंडा अमेझ सब-कॉम्पॅक्ट सेडानच्या सर्व व्हेरिएंट्सवर कंपनीने एकूण 15,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला आहे. यामध्ये होंडाच्या जुन्या ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस, 6,000 रुपयांपर्यंतचा होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट 31 मार्च 2022 पर्यंत दिला जात आहे.
टॅग्स :AutomobileवाहनHondaहोंडा