शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक रुपयाही न देता घरी न्या Honda ची नंबर १ बाईक, कॅशबॅकही मिळणार; पाहा ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 1:31 PM

1 / 6
होंडा मोटरसायकल्स अँड स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) आपल्या दुचाकींवर सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. यामुळे कंपनीची होंडा शाइन मोटरसायकल 3 ऑफर्ससह खरेदी करता येणार आहे. या ऑफरमुळे, तुम्ही कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय शाइन खरेदी करू शकाल.
2 / 6
तर दुसरीकडे कंपनी यावर नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देत ​​आहे. एवढेच नाही तर ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला 5000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. म्हणजेच जरी तुमचं बजेट कमी असलं तरी तुम्ही सहजरित्या ही बाईक विकत घेऊ शकता.
3 / 6
होंडा टू-व्हीलरची ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत वैध असेल. याशिवाय, जर तुम्ही निवडक डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या मदतीने ही बाईक खरेदी केली तरीही तुम्हाला काही ऑफरचा लाभ देखील मिळेल. कंपनीला या ऑफरसह आपल्या नंबर-1 बाईकची विक्री वाढवायची आहे. Honda आपल्या सर्वात लोकप्रिय आणि देशातील नंबर-1 स्कूटर Activa वर देखील अशीच ऑफर देत आहे.
4 / 6
कंपनीने आपल्या या सर्वाधिक विक्री होणाऱ्या शाईन या बाईकचे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. नवी होंडा शाईन सेलिब्रेशन एडिशनमध्ये कॉस्मेटिक अपडेट आणि नवी कलर स्कीम मिळते.
5 / 6
ही बाईक दोन कलर ऑप्शन मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि मॅट संग्रिया रे मेटॅलिक ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. बाईकमध्ये फ्रेश स्ट्रीप्स, गोल्डन विंगमार्क आणि फ्युअल टँकवर एक सेलिब्रेशन लोगो मिळतो. यात नवी ब्राऊन सीटही मिळते. बाकी या बाईकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
6 / 6
शाईन स्पेशल एडिशनमध्ये 123.94cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, फ्युअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,500 RPM वर 10.5 bhp पॉवर आणि 6,000 RPM वर 11 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याला CBS सोबत मागील बाजूस ड्रम ब्रेक आणि फ्रन्ट ड्रम/डिस्क ब्रेक पर्याय मिळतो.
टॅग्स :Hondaहोंडाbikeबाईक