शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमी बजेटमध्ये पावरफुल इंजिन; Honda ने आणली नवी बाईक, Pulsar-Apache ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 3:12 PM

1 / 6
भारतातील लोकप्रिय टू-व्हिलर ब्रँड Honda Motorcycle and Scooters India (HMSI) ने आज आपली नवीन Honda SP160 बाईक भारतात लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेली ही बाईक सिंगल आणि ट्विन डिस्क व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. सिंगल डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 1.17 लाख रुपये तर ट्विन डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.22 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनी या महिन्याच्या अखेरीस बाईकची डिलिव्हरी सुरू करेल.
2 / 6
Honda SP 160 मध्ये काय खास आहे: SP 160 ही आधीच्या SP125 चे पुढचे पॉवरफुल व्हर्जन आहे. ही अधिक वजनदार आणि जास्त पॉवरच्या इंजिनने सुसज्ज आहे. दोन्ही बाईकचा लुक आणि डिझाईन बर्‍यापैकी सारखाच ठेवला आहे. यात सेम बॉडी पॅनल, V-आकाराचे एलईडी हेडलाइट, रुंद टँक, उंच टेल सेक्शनसह सिंगल-पीस सीट, सिंगल ग्रॅब रेल, क्रोमसह साइड-स्लंग एक्झॉस्ट मफलर यांसारख्या अनेक समानता आहेत. एकूणच, नवीन Honda SP 160 हे कंपनीच्या अनेक मॉडेल्सचे मिश्रण आहे.
3 / 6
पॉवर आणि परफॉर्मन्स: कंपनीने या बाईकमध्ये Unicorn 160 आणि Xblade मधून घेतलेले 162.7cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 7,500 rpm वर 13.46 bhp पॉवर आणि 14.58 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की, ते युनिकॉर्नच्या तुलनेत जास्त हॉर्स पॉवर आणि 0.5 Nm जनरेट करू शकेल. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
4 / 6
ही नवीन एसपी 160 डायमंड फ्रेमवर आधारित आहे. बाईकच्या पुढील बाजूस पारंपरिक टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेंशन मिळेल. फ्रंटला सिंगल-चॅनल एबीएससह 276 मिमी फ्रंट डिस्क आणि 220 मिमी रिअर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. कंपनीने बाईकमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स दिली आहेत, जी 80/100 आकाराच्या समोर आणि 130/70 आकाराच्या मागील MRF Nylogrip टायर्सवर चालतात. याला 177 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळतो.
5 / 6
कंपनीने Honda SP 160 मध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच आणि हेजार्ड स्विचसह पूर्ण-डिजिटल LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळेल. इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, फ्युल गेज आणि गियर पोझिशन इंडिकेटर मिळते. Honda नवीन SP 160 एकूण 6 रंगांत उपलब्ध आहे. यात मॅट डार्क ब्लू मेटॅलिक, पर्ल स्पार्टन रेड, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, पर्ल इग्नाइट ब्लॅक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि पर्ल डीप ग्राउंड ग्रे आहे.
6 / 6
या बाईकशी स्पर्धा:बाजारात ही बाईक प्रामुख्याने बजाज पल्सर N160 आणि TVS Apache RTR 160 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल. ज्याची किंमत अनुक्रमे 1.31 लाख आणि 1.19 लाख रुपयांपासून सुरू होते. या बाईकला Honda Unicorn चेच स्पोर्ट व्हर्जन म्हणता येईल. या सेगमेंटमध्ये या बाईकची कामगिरी कशी असेल, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
टॅग्स :HondaहोंडाbikeबाईकAutomobileवाहनbajaj automobileबजाज ऑटोमोबाइल