how to increase car mileage, average? Follow this tricks, get 10 percent more ...
कारचे अॅव्हरेज कमी झालेय का? या ट्रिक फॉलो करा, 10 टक्के जास्त मिळवा... By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 2:41 PM1 / 11इंधनाचे दर चढे आहेत. पुढील काळात पेट्रोलने शंभरी आणि डिझेलने नव्वदी नाही गाठली तर करलाभापेक्षा खूप दिलासादायक ठरेल. परंतू तसे जरी झाले तरीही सध्याचे दर खिसा कापणारे आहेत. 2 / 11आताच कृषी सेस लागणार असल्याची बातमी आली आहे. हा सेस कंपन्यांनी भरायचा असेल तर ठीक नाहीतर त्याचा भारही आपल्याच खिशावर आला तर मग सायकल घेऊन फिरावे का असा प्रश्न पडणार आहे. 3 / 11सध्यातरी आपल्या हातात कारचे मायलेज वाढविणे एवढेच आहे. जर तुमची कार कमी मायलेज देऊ लागली असेल तर टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला ६ छोट्या छोट्या ट्रीक सांगणार आहोत. 4 / 11या ट्रीकच्या आधारे तुम्ही तुमच्या वाहनाचे 10 टक्के मायलेज वाढवू शकता. यासाठी तुम्हाला काही नवीन कार घेण्याची किंवा मोठे बदल करण्याची गरज नाहीय...चला तर मग जाणून घेऊया...5 / 11सारखा सारखा ब्रेक लावणे किंवा कमी अंतरासाठी जोरात अॅक्सलरेट करणे यामुळे इंधन जास्त लागते. शहरात हा प्रकार नेहमीच होतो. कारण घाईत वाट काढण्यासाठी वेग वाढविणे आणि ब्रेक लावणे हे प्रकार होतात. हे प्रकार कमी केले तर मायलेज वाढेल.6 / 11तुमची कार जेवढी वेगाने चालविणार तेवढेच इंजिन जास्त ताकद घेणार. याचा थेट परिणाम कारच्या मायलेजवर पडणार आहे. 7 / 11जर तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी असेल तर वाहनाचे मायलेज कमी होते. बरेच दिवस टायरमध्ये हवा भरली जात नाही. यामुळे थोड्या थोड्या काळाने टायरची हवा तपासून घ्यावी. 8 / 11जर तुमच्या कारचा एअर फिल्टर खराब झाला असेल तर त्याचा थेट परिणाम हा इंजिनावर पडतो. यामुळे इंजिन इंधन वेगाने जाळायला सुरुवात करते व मायलेज घटते. फिल्टरमध्ये धूळ, माती आणि केस, पिसे आदी घटक अडकतात. हा फिल्टर चेक करत रहावा. गरज असेल तर बदलावा साफ करावा.9 / 11जर तुम्हाला जास्त मायलेज हवे असेल तर टायरमध्ये नायट्रोजन भरून घ्यावा. याचे फायदेही अधिक आहेत. टायरमध्ये हवा लवकर लीकेज होते, तर नायट्रोजनला वेळ लागतो. यामुळे जर योग्य प्रमाणात हवा राहिली तर 30 टक्के जास्त मायलेज नियंत्रणात ठेवता येते. 10 / 11जर तुम्हाला जास्त मायलेज हवे असेल तर वेगावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कार 45 ते 60 किमी प्रतितासाच्या वेगाने चालवावी लागणार आहे. या रेंजवर सर्वाधिक मायलेज मिळते. कार जास्त वेगाने किंवा अगदीच कमी वेगाने चालविली तरीदेखील इंधन जास्त जळणार आहे. तसेच सारखे सारखे गरज नसेल तेव्हा गिअर बदलणेही अनावश्यक आहे.11 / 11कारची सर्व्हिस वेळेवर आणि नीट नसेल तर त्याचा कारच्या मायलेजवर मोठा परिणाम जाणवतो. वेळेवर सर्व्हिसिंग केल्यास कारचे पार्ट आणि इंजिन चांगल्याप्रकारे काम करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications