शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Driving License आधार कार्डला कसे लिंक कराल? जाणून घ्या सोपी Online प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:07 PM

1 / 10
आधार कार्ड वापरण्याची सक्ती केलेली नसली तरी देखील अनेक ठिकाणी आधार कार्ड (Aadhaar Card) महत्वाचा कागदपत्र केला आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड बनविणे गरजेचे केले आहे. काहीही असले तरीही अनेक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे बनलेले आहे. Link Aadhaar To Driving License
2 / 10
आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याची अंतिम तारीख आता ३१ मार्च करण्यात आली आहे. याचबरोबर आता आधार कार्ड तुमच्या ड्रायव्हिंग लायसनला देखील जोडण्यास सांगितले आहे. (Link My Aadhaar Card To Driving License)
3 / 10
जर तुम्ही आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसनला जोडण्याचा विचार करत असाल तर ते एकदम सोपे आहे. बनावट लायसनला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Link Aadhaar To Driving License In Maharashtra.)
4 / 10
सध्यातरी सरकारकडून तसा अधिकृत आदेश आलेला नाहीय. मात्र सुरक्षेचा विचार करता तुम्ही हे पाऊल उचलू शकता. इथे आम्ही तुम्हाला आधारला ड्रायव्हिंग लायसन लिंक करण्याची पद्धत सांगणार आहोत.
5 / 10
ड्रायव्हिंग लायसन आधारला लिंक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला sarathi.parivahan.gov या सरकारी वेबसाईटवर जावे लागणार आहे.
6 / 10
यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचे म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन ज्या राज्याचे आहे त्या राज्याची निवड करावी लागणार आहे.
7 / 10
यानंतर नवीन विंडो खुली होणार आहे. नव्या विंडोच्या उजव्या बाजुला मेनूबारमध्ये अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करावे.
8 / 10
यानंतर ऑन ड्रायव्हिंग लायसन (रिन्यूअल/डुप्टिकेट/Aedl/अदर्स) क्लिक करावे.
9 / 10
यानंतर दुसरी विंडो खुली होणार आहे. यामध्ये पुन्हा राज्याची निवड करावी. यानंतर कंटीन्यूवर क्लिक करावे.
10 / 10
यामध्ये आधार कार्डची माहिती द्यावी. शेवटी प्रोसिडवर क्लिक करून पुढे ड्रायव्हिंग लायसनची माहिती द्यावी. तिथे मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा पर्याय दिसेल. येथे आधार क्रमांक आणि ओटीपी टाकावा लागणार आहे. यानंतर लायसन अपडेट होईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRto officeआरटीओ ऑफीस