शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Types Of Engine Oil: किती प्रकारची असतात इंजिन ऑईल, पहा एकदा... दोन मिनिटे तुमचे पैसे वाचवतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 4:01 PM

1 / 5
कार आणि स्कूटरमध्ये इंजिन चालण्यासाठी ऑईलची गरज लागते. ऑईल नसेल तर इंजिनमधील भाग घासून ते जळते किंवा खराब होते. यामुळे वेळोवेळा ठराविक अंतरानंतर इंजिन ऑईल बदलणे आवश्यक असते. परंतू, बाजारात एवढ्या प्रकारची इंजिन ऑईल आहेत की अनेकदा आपल्यालाही प्रश्न पडतो, कोणते इंजिन ऑईन चांगले... त्याचा उपयोग काय.
2 / 5
पेट्रोलियम रिफायनरीमध्ये कच्च्या तेलापासून इंजिन तेल वेगळे केले जाते. याला नैसर्गिक तेल किंवा खनिज तेल असेही म्हणतात. हे तेल सर्वाक स्वस्त असते. परंतू ते जास्त काळ चालत नाही.
3 / 5
सिंथेटिक तेलापेक्षा सामान्य इंजिन तेल खूपच स्वस्त असते. याचबरोबर साध्या तेलाची कार्यक्षमता देखील कमी असते. यामुळे त्यावर प्रक्रिया करून सेमी सिंथेटीक तेल तयार करण्यात आले आहे.
4 / 5
पूर्ण सिंथेटिक इंजिन तेल हे आधुनिक प्रकारचे इंजिन तेल आहे. हे तेल तेल कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत पूर्णपणे रासायनिक पद्धतीने बनवले जाते. ते सर्वात महाग आहे. सिंथेटिक इंजिन तेल इतरांपेक्षा जास्त काळ टिकते.
5 / 5
उच्च-मायलेज इंजिन ऑइलमध्ये काही विशेष घटक टाकले जातात. ज्यामुळे कारचे मायलेज देखील वाढते. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या गाड्यांमध्ये हे तेल वापरले जाते. जर तुम्ही तुमची कार किंवा बाईक जास्त वापरत असाल तर मायलेजसाठी हाय-मायलेज इंजिन ऑइल हा उत्तम पर्याय असू शकतो.