शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशात किती प्रकारचे रस्ते? तुम्ही कोणत्या रस्त्यांचा वापर करता...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 3:07 PM

1 / 6
कोणत्याही देशाचा रस्ता त्या देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. भारत देखील अशा देशांपैकी एक आहे. महत्वाचे म्हणजे भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे, ज्यांचे रस्त्यांचे जाळे सर्वाधिक आहे. रस्ता हे भारतातील वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. आपल्या देशात किती प्रकारचे रस्ते आहेत, माहिती आहेत का?
2 / 6
एक्स्प्रेस वे : एक्स्प्रेस वे हा असा रस्ता आहे, ज्यावर एकाचवेळी सहा ते आठ वाहने प्रवास करू शकतात. या रस्त्यांच्या लेनची संख्या सहा ते आठ असते. चकचकीत रस्ते आणि सुरक्षा यामुळे या मार्गावर दुप्पट वेगाने वाहने चालतात. त्यांचे बांधकाम आणि देखभालीचे काम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) द्वारे हाताळले जाते. याचा टोलही सर्वाधिक असतो.
3 / 6
राष्ट्रीय महामार्ग: राष्ट्रीय महामार्ग हे असे रस्ते आहेत ज्यांना प्रामुख्याने महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. हे मुख्य रस्ते भारतातील विविध राज्ये आणि प्रमुख शहरांना जोडतात. राष्ट्रीय महामार्गाची रुंदी सामान्यतः 7 मीटर ते 15 मीटर पर्यंत असते.
4 / 6
राज्य महामार्ग: राज्य महामार्ग प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा ठिकाणे आणि राज्यातील प्रमुख शहरांना जोडतात. याशिवाय ते आसपासच्या राज्यांनाही जोडतात.
5 / 6
जिल्हा रस्ते: जिल्हा रस्ते प्रामुख्याने जिल्हा परिषद, जिल्हा मुख्यालय, राज्यातील लहान आणि मोठी शहरे तसेच राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांना जोडतात.
6 / 6
ग्रामीण रस्ते: जे रस्ते कोणत्याही गावाला जिल्हा रस्त्यांशी जोडतात त्यांना पंचायत किंवा ग्रामीण रस्ते म्हणतात. या रस्त्यांवर फक्त हलकी वाहतूक सुरू असते. ग्रामीण भागाच्या विकासात हे रस्ते फार महत्त्वाची भूमिका बजावतात.
टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक