शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:38 PM

1 / 8
वाहन चालवताना आपल्या जवळ कागदपत्र बाळगणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. पीयुसी हेदेखील वाहनासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांपैकी एक आहे. कार किंवा बाईक चालकाकडे कायमच पीयुसी असणं आवश्यकही आहे.
2 / 8
मोटारसायकल, कार किंवा स्कूटर चालकांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र (पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट) नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. ज्या वाहन चालकांकडे हे सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडून १०हजार रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार प्रत्येक मोटार वाहन जे बीएस १, बीएस २, बीएस ३ आणि बीएस ४ इंजीनवर चालतं त्या प्रत्येक वाहनधारकाकडे पीयूसी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. 
3 / 8
वाहनातील उत्सर्जन स्तर किती आहे हे याच्या माध्यमातून दिसून येतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमचं वाहन मर्यादेपेक्षा अधिक प्रदुषण तर करत नाही ना हे याद्वारे तपासलं जातं.
4 / 8
लायसन्स, विमा आणि आरसी व्यतिरिक्त, जर तुमच्याकडे गाडी चालवताना PUC प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. दिल्लीत PUC शिवाय प्रवास करणाऱ्यांना १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्ही पीयूसी प्रमाणपत्र ऑनलाइन कसे डाउनलोड करू शकता हे पाहुया.
5 / 8
वाहनाच्या मालकांना पीयुसी ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी एक सोपा पर्याय देण्यात आला आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला परिवहन सेवेच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला टॅबवर एक पीयुसीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
6 / 8
त्यानंतर आपल्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबरचे अंतिम पाच अंक टाकण्यास सांगितलं जाईल. यासोबतच एक कॅप्चा कोडही टाकावा लागेल.
7 / 8
सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीयुसीची स्थिती दिसेल. तसंच व्हॅलिड असेल तर तुम्हाला पीयुसी डाऊनलोड करता येईल. जर तुमची पीयुसी उपलब्ध असेल तर तुम्ही ती डाऊनलोड आणि प्रिन्टही करू शकता.
8 / 8
जर, तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर ते बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला गाडी घेऊन तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात अर्थात पीयूसी सेंटरवर जावे लागेल. तिथे सेंटरवर उपस्थित कर्मचारी गाडीची तपासणी करतील. त्यानंतर पीयूसी प्रमाणपत्र तुम्हाला देतील. यासाठी फारसा वेळही लागत नाही. तसेच, अवघ्या ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसbikeबाईकcarकार