how to protect your car from rats rodents and mice with these easy tips spray repellent
कार आणि बाइकमध्ये उंदरांनी उच्छाद मांडलाय का? हे आहेत जालीम उपाय, टेन्शन कायमचं दूर... By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 4:36 PM1 / 9कार आणि बाईकमध्ये उंदरांनी उच्छाद मांडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा तुमच्याही सोबत असा प्रसंग घडला असेल. एकदा का उंदरांना सवय लागली की ते तुमच्या कार किंवा बाईकमधून सहजासहजी बाहेर पडत नाहीत. कधी कधी तर गाडीचं संपूर्ण वायरिंग कुरतडून मोठं नुकसान करतात आणि याचा त्रास वारंवार होत असेल तर नेमकं काय करावं तेही काही सुचत नाही. 2 / 9कार किंवा बाईकमध्ये उंदीर घर करुन राहण्याचं नेमकं कारण काय आहे ते आधी समजून घ्यायला हवं. तसंच उंदारांनी तुमच्या गाडीत आता बस्तान मांडलंय हे कसं ओळखावं तर तुमच्या गाडीमधून एक उग्र वास येण्यास सुरुवात होते. 3 / 9सर्वात सोपा आणि साधा मार्ग म्हणजे तुमची कार किंवा इतर कोणतंही वाहन नेहमी स्वच्छ ठेवा. वाहन स्वच्छ ठेवल्यानं अशा ठिकाणी उंदीर येण्याची शक्यता कमी होते. दुसरं म्हणजे पार्किंगची जागा निवडताना काळजी घ्या. उंदरांचा वावर असेल अशा ठिकाणी गाडी पार्क करणं टाळावं. म्हणजेच जिथं जास्त अंधार आहे किंवा आजूबाजूला कचराकुंडी असेल अशा ठिकाणी गाडी पार्क करणं टाळावं. 4 / 9कारमध्ये अन्नपदार्थ अजिबात ठेवू नका. आता लाँग ड्राइव्हवेळी भूक लागणं आणि कारमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणं ही सामान्य गोष्ट आहे. पण प्रवास संपल्यानंतर कारमध्ये कुठेही अन्नपदार्थ शिल्लक राहणार नाहीत याची काळजी घ्या. 5 / 9पेपरमिंट ऑइलचा वास उंदारांना सहन होत नाही असं म्हणतात. त्यामुळे तुमच्या वाहनाला उंदारांनी घर केलं असेल तर कापसाचे छोटे-छोटे बोळे करुन ते पेपरमिंट ऑइलमध्ये बुडवून वाहनात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. जिथून उंदीर वाहनात प्रवेश करु शकतात अशा संभाव्य जागांवर हे कापसाचे बोळ ठेवा. काही दिवसांनी पुन्हा तसंच करा. उंदीरांच्या त्रासापासून तुमची सुटका होईल. 6 / 9कारमधील अशा संभाव्य जागांचा शोध घ्या जिथून उंदीर आत प्रवेश करू शकतात. अशा ठिकाणांना सील करणं शक्य असेल तर सील करा आणि यात तुम्हाला अडचण येत असेल तर एखाद्या मेकेनिकची मदत यासाठी घेऊ शकता. 7 / 9कार किंवा बाइकमध्ये उंदीर उच्छाद मांडत असतील तर त्यांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातूनही रोखता येतं. सध्या बाजारात असे अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस उपलब्ध आहेत. ज्यातून एका विशिष्ट प्रकारचा आवाज येतो जो उंदरांना कारमध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो. फक्त उंदीरच हा आवाज ऐकू शकतात अशापद्धतीचा साऊंड या डिव्हाइसमध्ये फिड करण्यात आलेला असतो. हे एक मोशन सेंसिटीव डिव्हाइस आहे. 8 / 9उंदरांना रोखण्याचा सर्वात मोठा आणि जालीम उपाय म्हणजे वाहन सातत्यानं वापरतं राहिलं पाहिजे. जर तुम्ही बऱ्याच कालावधीसाठी वाहन एकाच जागी उभं करुन ठेवत असाल तर उंदीर अशा वाहनांना आपलं घर बनवतात. वाहनाच्या इंजिनपर्यंत ते सहजपणे पोहोचतात आणि मोठं नुकसान करतात. बरेच दिवस वाहन बंद राहिल्यानं इंजिन देखील थंड पडतं त्यामुळे उंदरांनाही वाहनात सहज वावरता येतं. त्यामुळे वाहन सातत्यानं वापरत राहणं गरजेचं आहे. 9 / 9बाजारात सध्या असे अनेक स्प्रे आहेत की जे उंदरांचा उच्छाद थांबवू शकतात. हे स्प्रे खूप स्वस्त आणि उपयोगी ठरतात. याची किंमत फक्त २०० रुपयांपासून सुरू होते. स्प्रेचा शिडकाव वाहनाच्या इंजिन, बोनट, बूट-स्पेस आणि इतर ठिकाणी करावा जेणेकरुन उंदीर वाहनात प्रवेश करणार नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications