Huawei launches electric SUV, with a range of 1200 km on a single charge
Huaweiने लाँच केली इलेक्ट्रिक एसयूव्ही, सिंगल चार्जवर मिळेल 1200 किमीची रेंज By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 4:45 PM1 / 10 Huawei ने एकेकाळी आपल्या फ्लॅगशिप फोनद्वारे स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला ठसा उमटवला होता. पण, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे कंपनीला मोठा फटका बसला. आता 2021 मध्ये स्मार्टफोन उत्पादनात 60 टक्क्यांनी कपात केल्यानंतर, Huawei इलेक्ट्रिक वाहन उद्योगात प्रवेश करण्यास तयार आहे.2 / 10 चीनच्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनींपैकी एक असलेल्या Huawei अलीकडेच त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार AIOT M5 Hybrid SUV चीनमध्ये लॉन्च केली. ही कार वीज आणि इंधन अशा दोन्ही पर्यायांवर धावू शकते. या कारमध्ये Huawei ने विकसित केलेली HarmonyOS नावाची एक अनोखी ऑपरेटिंग सिस्टीम आहे.3 / 10 ही प्रणाली Huawei साठी Android आणि Windows चा पर्याय म्हणून काम करेल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रणाली स्मार्ट कारसह विविध इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपकरणे आणि गॅझेट्सशी कनेक्ट होऊ शकते.4 / 10 पहिल्या पाच दिवसांत या कारसाठी 6,000 हून अधिक बुकिंग झाले आहेत. AIOT ची पहिली लक्झरी स्मार्ट इलेक्ट्रिक SUV M5 Huawei आणि चीनी कंपनी Seres (सेरेस) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.5 / 10 पॉवरसाठी, Aito M5 ला एक किंवा दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळतात. 204 hp च्या कमाल पॉवरसह रियर-व्हील ड्राइव्ह व्हर्जन आहे. तर, 224 hp च्या पॉवर आउटपुटसह 4-व्हील ड्राइव्ह पर्याय उपलब्ध आहे. 4-व्हील ड्राइव्हमध्ये एकूण 428 एचपी पॉवर आउटपुट निर्माण करण्याची क्षमता आहे.6 / 10 Huawei Aito M5 मध्ये 1.5-लिटर टर्बोचार्ज केलेले 4-सिलेंडर इंजिन देखील आहे, जे 125 hp जनरेट करते. पण हे, 40 kWh बॅटरी पॅक रिचार्ज करण्यासाठी जनरेटर म्हणून कार्य करते. कंपनीचा दावा आहे की एसयूव्ही एकूण 1,195 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. तसेच ही SUV फक्त 4.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.7 / 10 Aito M5 चा आतील भाग खूपच प्रशस्त आहे. यात 15.6-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी Huawei ऑपरेटिंग सिस्टमसह येते. डिस्प्लेचा इंटरफेस हार्मनी ओएस प्रणालीवर चालतो. यात स्प्लिट-स्क्रीन आणि थ्रीडी फेस रेकग्निशनचा पर्याय आहे. याव्यतिरिक्त, Huawei वॉच किंवा स्वयंचलित Huawei ID लॉगिनमधील NFC चिप वापरुन कार अनलॉक केली जाऊ शकते.8 / 10 यात 10.4-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जो डिजिटल डिस्प्लेसह येतो. सुरक्षिततेचे वैशिष्ट्य म्हणून, कंपनीने विंडशील्डच्या डाव्या खांबावर एक कॅमेरा दिला आहे ज्यामुळे ड्रायव्हरच्या सतर्कतेवर नेहमीच लक्ष ठेवले जाते.9 / 10 Huawei Aito M5 SUV ची लांबी 4.77 मीटर आहे आणि तिचा व्हीलबेस 2.88 मीटर आहे. एसयूव्हीची रचना पोर्श मॅकनपासून प्रेरित असल्याचे दिसते. समोरुन SUV मोठ्या आणि रुंद हेडलाइट्ससह येते. त्याच्या अलॉय व्हीलसाठी मोठ्या चाकांच्या कमानी देण्यात आल्या आहेत. आणि मागील लाइट क्लस्टर टेलगेटवर पसरलेला आहे.10 / 10 Huawei रंग पर्यायांमध्ये SUV ऑफर करत आहे. यात सिरॅमिक व्हाईट, पाइन फ्रॉस्ट ग्रीन, आइस क्रिस्टल ग्रे, गिल्ट ब्लॅक, मिहाई ब्लू आणि अझर ब्लू या रंगांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications